wardha news Congress leader Vijay Wadettiwar criticized CM Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: एकनाथ शिंदे सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली; विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Vijay Wadettiwar News: एकनाथ शिंदे सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली, अशी टीका राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.

Satish Daud

चेतन व्यास, साम टीव्ही

Vijay Wadettiwar on CM Eknath Shinde

ईडीच्या रडारवर असणाऱ्या २१ लोकांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक आहे. ते सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली, अशी टीका राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली. एकनाथ शिंदे यांनी माणसाला शुद्ध करणारा मशीन आणि पावडर शोधलाय, असा टोला देखील वडेट्टीवर यांनी लगावला. ते वर्ध्या येथे बोलत होते. (Latest Marathi News)

वर्ध्यात (Wardha News) मागील सहा दिवसांपासून कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी युवकांचे धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

राज्य सरकारने घेतलेला कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होणार नाहीय तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. सरकारला (Eknath Shinde) हा निर्णय परत घ्यावा लागेल, असा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. असं सरकारला इशारा दिलाय. दरम्यान गांधी जयंती पासून भाजपाची ओबीसी जनजागरण यात्रा वर्धेतून सुरु होणार आहे. यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.

भाजपाला आमचा प्रश्न आहे की त्यांनी ओबीसीसाठी काय केलं? जातीनिहाय जनगणना केली त्याचं उत्तर द्यावं संसदेत जे महिला आरक्षण बील आणलं, त्यात महिलांसाठी किती जागा राखीव केल्या हे देखील भाजपने सांगावं. आम्ही शिष्यवृत्तीसाठी 100 पोरांना पाठवायचा शासन निर्णय काढला होता त्याची अंमलबजावणी होत नाही, असे सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

सफाई अभियानाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांची सफाई केल्याची टीका केली. यावरही वडेट्टीवर यांनी एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. एकनाथ शिंदे काही खोट बोलले नाही, त्यातील ते एक आहे. जे सफाई झाली ते महाराष्ट्राचे एकवीस लोक ईडीच्या रडारवर होते ते सत्तेत गेले म्हणजे ती सफाई झाली स्वच्छ झाले, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT