CNG-PNG Price: आनंदाची बातमी! सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात; मुंबईत मध्यरात्रीपासूनच दर बदलले

CNG-PNG Price in Mumbai: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत सीएनजी-पीएनजी दरामध्ये कपात करण्यात आली आहे.
Good news for mumbai citizens mahanagar gas limited reduces cng png rate 2 october 2023 know latest rate
Good news for mumbai citizens mahanagar gas limited reduces cng png rate 2 october 2023 know latest rate Saam TV
Published On

CNG-PNG Price in Mumbai

इंधन दरवाढीने होरपळून निघालेल्या वाहनचालकांची आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत सीएनजी-पीएनजी दरामध्ये कपात करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवीन दर जारी केले आहेत. यामुळे मुंबईतील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  (Latest Marathi News)

Good news for mumbai citizens mahanagar gas limited reduces cng png rate 2 october 2023 know latest rate
Mega Block News: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हार्बर मार्गावर आजपासून पाच दिवस मेगाब्लॉक, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत (Mumbai News) सीएनजीची किंमत 3 रुपयांनी तर पीएनजीची किंमत 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दर कमी झाल्याची माहिती दिली आहे. घरगुती वापर आणि वाहनांमध्ये नॅचरल गॅसच्या वापराला उत्तेजन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

दरम्यान, नवे दर लागू झाल्यानंतर मुंबईकरांना सीएनजी 76 रुपये प्रति किलोच्या दराने, तर पीएनजीची किंमत 47 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. सध्याच्या घडीला मुंबईत अनेक वाहने सीएनजी-पीएनजीवर चालतात. वाहनधारक मोठ्या संख्येनं सीएनजीच्या (CNG-PNG) गाड्यांचा वापर करतात. तर, मुंबईत काही ठिकाणी स्वयंपाकासाठी देखील पीएनजीचा वापर केला जातो.

अशातच महानगर गॅस लिमिटेडनं घेतलेल्या दर कपातीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा धक्का दिला. 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक गँस सिलिंडरच्या दरात तब्बल 204 रुपयांची वाढ करण्यात आली.

या दरवाढीनंतर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 1 हजार 684 रुपयांना विकला जाणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गँस सिलिंडरच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती गँसच्या किमतीत 200 रुपयांची कपात केली होती.

Edited by - Satish Daud

Good news for mumbai citizens mahanagar gas limited reduces cng png rate 2 october 2023 know latest rate
Rashi Bhavishya: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच या राशींचं भाग्य चमकणार; सर्व टेन्शन मिटणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com