Wardha Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गलगतची जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ गुन्ह्यांची चोरट्याकडून उकल

समृद्धी महामार्गलगतची जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ गुन्ह्यांची चोरट्याकडून उकल

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : काही महिन्यांपासून जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेतातील जनावरे चोरून नेण्याचे प्रमाण वाढले होते. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील भिवापूर येथून जनावरे चोरणाऱ्या सहाजणांच्या टोळीचा पर्दाफाश करीत अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मालवाहू (Samruddhi Mahamarg) वाहनासह पाच मोबाईल व रोख असा एकूण १३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. (Live Marathi News)

समृद्धी महामार्गालगतच्‍या शेतातून चोरी होत असलेल्‍या गुरांचा तपासाबाबत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गांभीर्याने दखल घेत ‘समृद्धी’ महामार्गावर गस्त वाढवून विशेष पथक गठित केले. समृद्धी महामार्गावरील वायफड ते नागपूर ते जालनापर्यंतचे सर्व टोल नाके तपासून प्रत्येक वाहनांवर बारीक नजर ठेवून तसेच जनावरे चोरी करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवले. यानंतर वाहनांवर पाळत ठेवून याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांत अजय धनराज चैधरी (वय २७), अतुल धनराज चौधरी (वय २९), गुंडेराव आनंद दडमल (वय २५), कुदन गब्बर गोयल (वय २२, रा. निष्टी पवणी जि. भंडारा), सुनील बारसू सावसाखळे (वय २२), स्वप्निल शंकर आत्राम (वय २२) यांचा समावेश आहे.

नऊ गुन्ह्यांची कबुली

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने (Wardha) महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर बारकाईने लक्ष केंद्रित करून सहा आरोपींना निष्पन्न केले. सर्व आरोपींना ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरींची कबुली दिली. आरोपींकडून मालवाहू वाहने, गुन्ह्यात वापरण्यात आलेले ५ मोबाईल, जनावरे विक्रीचे ७० हजार रुपये रोख असा एकूण १३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीनी सिदी रेल्वे, सेलू, पुलगाव, कारंजा, सावंगी हद्दीत जनावरे चोरीची कबुली दिली. या तपासामध्ये आणखी गुन्हे उघड होऊन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT