Jalna Crime News: काकानेच काढला पुण्याचा काटा, जालन्यात वंचितच्या जिल्हा महासचिवाची हत्या

Vanchit Bahujan Aghadi: संतोष यांच्या काकाने त्यांची दोन मुलं आणि दोन जावयांच्या मदतीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam Tv
Published On

लक्ष्मण सोळुंके, जालना

Jalna News: जालन्यामध्ये (Jalna) वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) जिल्हा महासचिवाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष आढाव (Santosh Adhav) असं हत्या झालेल्या वंचितच्या महसचिवाचे नाव आहे. जालन्याच्या रामनगर साखर कारखाना परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जमिनीच्या वादातूनच त्यांची हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जालना पोलीस (Jalna Police) याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Jalna Crime News
Maharashtra Cow Milk Price: राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा, सरकारकडून गायीच्या दूधाचे दर निश्चित; 21 जुलैपासून होणार लागू

मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष आढाव यांच्यावर प्राणघातक हल्ला करत हत्या करण्यात आली. शनिवारी रामनगर साखर कारखाना परिसरात असलेल्या गायरान जमीन परिसरात ही घटना घडली. प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष आढाव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Jalna Crime News
Maharashtra Politics: विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार? महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक

संतोष आढाव यांनी रामनगर परिसरात असलेल्या गायरान जमिनीवर गाळ्यांचे बांधकाम केले होते. यावरुनच संतोष यांचा काकासोबत वाद झाला. या वादातून संतोष यांच्या काकाने त्यांची दोन मुलं आणि दोन जावयांच्या मदतीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. लाठ्या-काठ्या, लोखंडी दांड्याने संतोष यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संतोष आढाव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

Jalna Crime News
Pune Water Cut: पुणेकरांना दिलासा! आठवडाभरासाठी 'या' परिसरातील पाणीकपात मागे

संतोष आढाव यांच्या हत्येप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी निवृत्ती आढाव याला ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपी हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्यात जखमी झालेल्या संतोष आढाव यांना वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com