Pune Water Cut: पुणेकरांना दिलासा! आठवडाभरासाठी 'या' परिसरातील पाणीकपात मागे

पुणेकरांना काही प्रमाणात पाणीकपातीपासून दिलासा मिळाला आहे.
Pune Water Cut
Pune Water Cutsaam tv
Published On

अक्षय बडवे

Pune News Today: दक्षिण पुण्यात एका आठवड्यासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या सिंहगड रस्ता, धनकवडी ते येवलेवाडी या दक्षिण पुण्याच्या भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी विस्कळित झाल्याने १७ ते २३ जुलै या आठवड्यातील सर्व ७ दिवस पाणी पुरवठा सुरू असेल. (Latest Marathi News)

Pune Water Cut
Chhatrapati Sambhaji Nagar: स्वतःच नवं घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; बांधकाम परवाना 30 दिवसांत मिळणार

खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने मे महिन्यापासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा (Water Supply) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा सर्वाधिक फटका हा वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाला बसला आहे.

दोन ते तीन दिवस या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने वडगाव केंद्राच्या हद्दीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. पाणी पुरवठा विभागाने वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या भागातील पाणी पुरवठा बंद ठेवला पण जलकेंद्रात बिघाड झाल्याने या भागात दोन दिवस पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. (Pune News)

Pune Water Cut
Political News: कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाखाली स्टंटबाजी; भाजपचे धैर्यशील पाटील यांचा खासदार निंबाळकरांवर निशाना

त्यामुळे पुणे महापालिकेने या भागात पुढच्या आठवड्यातील पाणी कपात करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तर उर्वरित शहरात ठरल्याप्रमाणे गुरूवारचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com