Pandharpur News Today: कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाखाली काही लोक स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना या योजनेतून किती पाणी मिळणार आहे, ते कुठे जाणार याची माहिती नाही,योजनेतील गावाची आणि तालुक्यांची नावे देखील नीट माहिती नाहीत, केवळ पत्रक काढून समाज माध्यमातून काही लोक स्टंटबाजी करत आहेत, असा टोला भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील पाटील यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना नाव न घेता लगावला. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर धैर्यशील मोहिते पाटील विरूध्द निंबाळकर असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला तत्वतः मंजूरी मिळाल्याचे माध्यमांना सांगितले. त्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही स्टंटबाजी असल्याची टीका केली.
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक आहेत. तर विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पुन्हा आपल्याच उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातूनच मोहिते विरूद्ध निंबाळकर असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण करण्याच्या एकमेव मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले. खासदार निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे माढ्यासाठी इच्छुक आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या मंजुरी वरून मोहिते पाटील आणि निंबाळकरांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.