Chhatrapati Sambhaji Nagar: स्वतःच नवं घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; बांधकाम परवाना 30 दिवसांत मिळणार

Marathi News: बांधकाम परवाण्यासाठी आतापर्यंत अनेक महिने आणि कधी कधी वर्षभर महापालिकेच्या दारात खेटे मारावे लागायचे पण आता एका महिन्यातचं म्हणजे 30 दिवसाच्या आत बांधकाम परवाना मिळणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji NagarSaam Tv
Published On

Chhatrapati Sambhaji Nagar News Today: छत्रपती संभाजीनगरात स्वतःचं नवं घर बांधणाऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. बांधकाम परवाण्यासाठी आतापर्यंत अनेक महिने आणि कधी कधी वर्षभर महापालिकेच्या दारात खेटे मारावे लागायचे पण आता एका महिन्यातचं म्हणजे 30 दिवसाच्या आत बांधकाम परवाना मिळणार आहे. शिवाय तुम्ही अर्ज केल्यानंतर जाणूनबुजून किंवा चिरीमिरीसाठी उशीर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhaji Nagar
Political News: कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाखाली स्टंटबाजी; भाजपचे धैर्यशील पाटील यांचा खासदार निंबाळकरांवर निशाना

बांधकाम परवानगी ऑनलाइन देण्यासाठी मनपाने बीपीएमएस प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल झाल्यापासून साठ दिवसांच्या आत संबंधिताला परवानगी मिळणे बंधनकारक आहे. पण महिनाभरातच बांधकाम परवानगी द्यावी, अशी सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी नगररचना विभागाला केली आहे.

जे वास्तुविशारद फाइलमध्ये मुद्दाम त्रुटी ठेवतील, त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, शिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. शासनाने बीपीएमएस प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने बांधकाम (Construction)परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar
Maharashtra Politics: विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार? महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक

अर्किटेक्टकडून ऑनलाइन प्रस्ताव सादर केला जात आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी भरून द्यावा लागतो. सुरुवातीला ऑनलाइन बांधकाम परवानगी घेताना अडचणी आल्या. मोबाइलवर येणारा ओटीपी नंबर आधार क्रमांकाला लिंक होत नसल्याने फायली ठप्प होत्या. आता त्यात सुधारणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com