Wardha Crime Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime : वर्धेत एकाच रात्री तीन घर टार्गेट; सोने चांदिच्या दागिनासह रोख केली लंपास, दोन दुचाकीही लांबविल्या

Wardha News : घरातील साहित्य अस्तव्यस्त होते व कपाट सुद्धा उघडले होते. जगताप यांनी तपासणी केली असता त्यांच्या घरातील नऊ तोळे सोन, काही चांदीचे साहित्य व ४० हजार रुपये चोरट्यानी लंपास केले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धा शहराला लागून असलेल्या वरुड व आलोडी परिसरात चोरट्यानी रात्री दरम्यान चांगलाच धुमाकूळ घातला. वरुड येथे एका घरावर तर आलोडी परिसरात दोन घरांना चोरट्यानी टार्गेट केले. यात सोने- चांदीचे दागिने, रोख रकमेसह दोन दुचाकीसुद्धा लंपास केल्या. लंपास केलेल्या दोन दुचाकीपैकी एक इलेक्ट्रिक दुचाकी असल्याने तिची चार्जिंग संपली. यामुळे चोरट्यांनी तिला रस्त्यात सोडून पसार झाले. 

सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरुड येथे प्रमिला जगताप या रात्री घराला कुलूप लावून घरा समोरील शेजारीच्या घरी झोपायला गेल्या होत्या. आज सकाळी त्या घरी परत आल्यावर त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. सोबतच घरातील साहित्य अस्तव्यस्त होते व कपाट सुद्धा उघडले होते. जगताप यांनी तपासणी केली असता त्यांच्या घरातील नऊ तोळे सोन, काही चांदीचे साहित्य व ४० हजार रुपये चोरट्यानी लंपास केल्याचं निदर्शनास आले. 

आलोडी येथे दोन घरात चोरी 

तसेच आलोडी येथे सुद्धा प्रकाश अडसुळे व सुनीता देवरकर यांच्या बंद असलेल्या घरात सुद्धा चोरट्यानी हात साफ केला. देवरकर यांच्या घरातील एक दुचाकी, दोन ग्रॅम सोन व तीन हजार रुपये तर अडसूळ यांच्या घरातून चांदीचे साहित्य व एक इलेक्ट्रिक चार्जिंग दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. सकाळी दोन्ही कुटुंब आल्यावर चोरी झाल्याच निदर्शनास आले. चोरट्यांनी तिन्ही बंद घरांना निशाणा बनवत चोरी केली.

चार्जिंग संपल्याने इलेक्ट्रिक बाईक सोडून पसार 
प्रकाश अडसुळे यांच्या घरातून चोरट्यानी एक इलेट्रिक दुचाकी लंपास केली होती. मात्र त्या दुचाकीची चार्जिंग संपल्याने ते वाहन रस्त्यात चोरट्यानी सोडले. इलेक्ट्रिक दुचाकीत जिपीएस असल्याने तिचा लोकेशन पाहत पोलिसांनी दुचाकी नागपूर जिल्ह्याच्या असोला गावाजवळून ताब्यात घेतली. यावरून चोरटे हे नागपूरला महामार्गाने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्या दृष्टीने तपास सूरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

GK: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

Ration Card KYC: कामाची बातमी! रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय?

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर अन् अशोक सराफ पुन्हा एकत्र, सेटवरचा फोटो समोर

SCROLL FOR NEXT