Wardha Crime Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime : शेजाऱ्याच्या घरी जाणे पडले महागात; चोरट्याने डाव साधत रोख रक्कमेसह दागिने लंपास

Wardha News : तुकडोजी वार्डातील रहिवासी प्रदीप भुसारी हे गिमा टेक्स या कंपनीत फिटर पदावर कार्यरत आहे. दरम्यान रविवारी रात्री प्रदीप यांनी आज डबल ड्युटी करत असल्याने घरी येणार नसल्याचे पत्नीला सांगितले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: रात्रीच्या वेळी घरी एकटी राहण्यापेक्षा महिला शेजारच्या घरी रात्री घराला कुलूप लावून झोपायला गेली. घराला कुलूप लागल्याच दिसताच चोरट्यानी डाव साधत घरातील रोख रकमेसह दागिन्यावर हात साफ केला. ही घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील तुकडोजी वार्डात घडली. यात चोरट्यानी कपाटात मुलाच्या शाळेच्या फिसचे ठेवलेली रक्कम देखील लंपास केली आहे. 

वर्ध्याच्या (Wardha) हिंगणघाट येथील तुकडोजी वार्डातील रहिवासी प्रदीप भुसारी हे गिमा टेक्स या कंपनीत फिटर पदावर कार्यरत आहे. दरम्यान रविवारी रात्री प्रदीप यांनी आज डबल ड्युटी करत असल्याने घरी येणार नसल्याचे पत्नीला सांगितले. पती घरी येणार नसल्याने पत्नीने घराला कुलूप लावत शेजारी घरी झोपायला गेल्या. मात्र आज सकाळी त्या आपल्या घरी परत आल्या, तर त्यांना घरातील मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. यानंतर त्यांनी घरात जाऊन पहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास (Crime news) आले. 

पोलिसांकडून तपास सुरु 
घरातील कपाटात ठेवलेली रोख आणि सोन्याच्या दागिन्यावर चोरट्यानी हात साफ केल्याचं निदर्शनास आले. या घटनेत चोरट्यानी मुलाच्या शाळेच्या शैक्षणिक फी साठी ठेवलेले २७ हजाराची रक्कम लंपास केली आहे. घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत तपासाला सुरवात केली आहे. हिंगणघाट (Police) पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दखल करण्यात आला असून मागील काही दिवसांपासून हिंगणघाट शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Barshi News : अतिवृष्टीत शेतीचे नुकसान; विवंचनेत शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, शासनाकडून कुटुंबीयांना मदतीची मागणी

Maharashtra Live News Update: शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाची आढावा बैठक सुरू

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

Pune Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT