Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : अट्टल दुचाकीचोर ताब्यात; सहा गुन्हे उघड झाले, ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

Wardha News : वर्धा शहर परिसरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. यानंतर पोलिसांनी तपास करत स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतानाच वर्ध्याच्या कारला चौकातून प्रलय कदम याला व एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी उच्छाद घातला होता. अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरी (Wardha) जाण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत शहर तसेच रामनगर पोलिस (Police) ठाण्यात दरदिवसआड तक्रारी दाखल होत होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

वर्धा शहर परिसरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. यानंतर पोलिसांनी तपास करत स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतानाच वर्ध्याच्या कारला चौकातून प्रलय कदम याला व एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याला विना क्रमांकाच्या दुचाकीचे कागदपत्रं विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. (Bike Theft) त्यांना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी साहील सातपुते तसेच तीन अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियदर्शनी कॉलेज समोरील कॅफे समोरून दुचाकी चोरल्याचे सांगितले. तसेच गजानननगर वर्धा येथून दोन दुचाकी, गांधी नगर येथून एक गाडी तसेच ऑक्सिजन पार्क, आयटीआय टेकडी येथून बुलेट, दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३ लाखाचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी आरोपी प्रलय कदम, साहील सातपुते तसेच तीन अल्पवयीन मुलांच्या ताब्यातून चोरी केलेल्या दुचाकी असा तीन लाख पाच हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत करुन सहा गुन्ह्यांची उकल केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, नरेंद्र पाराशर, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, अमरदीप पाटील, रामकिसन इप्पर, नितीन ईटकरे, संघसेन कांबळे, अरविंद इंगोले, मिथुन जिचकार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT