Chhatrapati Sambhajinagar crime Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!

Chhatrapati Sambhajinagar crime : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ. सावत्र आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू.

Namdeo Kumbhar

Chhatrapati Sambhajinagar crime News : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो लपवून नेण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत होते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना यात यश आले नाही. पोलिसांनी आई-बापाला ताब्यात घेतले आहे. मुलीचे प्रेमसंबंध असल्याने हत्याचा केल्याचा संशय़ पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद केली असून चौकशी केली जात आहे.

नेमकी घटना काय घडली ?

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातून एका कारमध्ये घरातील घरगुती साहित्यासोबत एक गादी गुंडाळून नेली जात होती. पोलिसांना या कारचा आणि त्यातील हालचालींचा संशय आला. त्यांनी कार अडवून तपासणी केली. यावेळी गादी उघडल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या गादीत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह होता.

सावत्र आईचा खळबळजनक दावा

पोलिसांनी तात्काळ कार ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मुलीच्या सावत्र आईने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली, त्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. सावत्र आई म्हणाली की, मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही केवळ अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे घेऊन जात होतो. मात्र, पोलीस तपासणीशिवाय आणि कायदेशीर प्रक्रियेविना मृतदेह अशा प्रकारे गुपचूप नेल्यामुळे संशय बळावला आहे. त्यामुळे त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सावत्र आईनेच मारले का?

वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य दखल घेतली. त्यांनी २० वर्षाच्या तरुणीच्या सावत्र आई आणि वडिलांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी संभाजीनगरमधील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, पोस्टमार्ट रिपोरट मिळाल्यानंतरच झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मारेगावात अतिक्रमण धारकांच्या विविध मागणीसाठी भाजप आक्रमक

खिशात पैसा खेळता राहणार, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार

Kidney Failure Signs: किडनी फेल होण्याचे पहिले लक्षण कोणते?

Summer Clothes: उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश राहण्यासाठी 'या' फॅब्रिकपासून बनलेले कपडे वापरा

Mamata Banerjee : मुख्यमंत्री लोकशाही धोक्यात घालत आहेत; ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाने फटकारले, ते प्रकरण नेमकं काय?

SCROLL FOR NEXT