MCOCA Court Valmik Karad was the mastermind behind Sarpanch Santosh Deshmukh Killing Case. Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार: विशेष मकोका न्यायालय

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ झालीय. वाल्मीक कराड टोळीचा म्होरक्या असून त्यांच्याच सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले आहे.

Bharat Jadhav

  • बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट

  • विशेष मकोका न्यायालयाने वाल्मीक कराडला मुख्य सूत्रधार ठरवलं

  • न्यायालयाने नोंदवलं की कराड टोळीचा म्होरक्या असून त्याच्याच सूचनेवरून हत्या झाली

  • या प्रकरणामुळे कराडच्या अडचणीत मोठी वाढ, मकोका अंतर्गत गंभीर कारवाईची शक्यता.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. विशेष मकोका न्यायालयाने देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलंय. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता.

या अर्जावरती निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली आहेत. वाल्मीक कराडला का दोष मुक्त करण्यात येत नाही. याबाबत महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामध्ये वाल्मीक कराड हा टोळीचा मोरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून हत्या केली.

वाल्मीक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मागच्या दहा वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. अवदा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे, फोनवर धमकवणे जीवे मारण्याच्या धमक्या देणे, त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब त्याचबरोबर डिजिटल इव्हिडन्स फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मीक कराडला दोष मुक्त करण्यात येत नाही. वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराडच या घटनेचा सूत्रधार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणे

1) वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य कोर्टाच निरीक्षण.

2) वाल्मीक कराडने आवाजा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला.

3) वाल्मीक कराड वर असलेल्या गुन्ह्यांचा कोर्टात उल्लेख.

4) वाल्मीक कराड वर एकूण 20 गुणी 7 गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातली.

5) वाल्मीक कराड वर असलेल्या गुन्ह्यांचा कोर्टात उल्लेख वाल्मीक कराड संदर्भात डिजिटल व्हिडिओ कोर्टात संपूर्ण पुरावांचा उल्लेख.

6) साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक आणि न्याय वैद्यकीय पुरावांच्या आधारे वाल्मीक कराडच टोळीचा मोरक्या.

7) खंडणी प्रकरणात त संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचना अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हस्ते चा गुन्हा केला.

8) दोन कोटी साठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या.

10) कराडच्या निर्दोष मुक्तीची व्याप्ती मर्यादित आहे खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळतो असे न्यायालयाने म्हटले आहे.

11) साक्षीदारांची जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे वाल्मीक कराड प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचे दर्शवत आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात कोणाला मुख्य आरोपी ठरवण्यात आलंय?

विशेष मकोका न्यायालयाने वाल्मीक कराड याला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ठरवलं आहे.

वाल्मीक कराडवर कोणते आरोप आहेत?

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, वाल्मीक कराड टोळीचा म्होरक्या असून त्याच्याच सूचनेवरून ही हत्या झाली.

हत्याकांड कुठे घडलं होतं?

हे हत्याकांड बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील आहे.

या प्रकरणावर काय निर्णय दिला गेला?

मकोका विशेष न्यायालयाने देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडची भूमिका अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT