Walmik Karad Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडची सुटका नाहीच; पुढील सुनावणी ४ ऑगस्टला

Santosh Deshmukh Case : मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh CaseSaam tv
Published On

बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा पुढारी असलेला वाल्मिक कराड यानंतर चांगलाच चर्चेत आला. वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्ती बाबतच्या अर्जावर ७ जुलै रोजी युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या अर्जावरती आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली असून हा अर्ज फेटाळला गेला आहे.

मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्यापही एक आरोपी मोकाट आहे. या हत्येतील आरोपी सुदर्शन घुलेने गुन्ह्याची कबुली दिली असून तपासादरम्यान या हत्येचे काही फोटो देखील समोर आले आहेत.

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येआधी वाल्मिक कराडने कोणाला फोन केला होता? धक्कादायक माहिती समोर

सरपंच देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर सहकऱ्यांची दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर ७ जुलै रोजी युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादानंतर आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या सुनावणीत मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा दोषी नसल्याचा अर्ज बीड न्यायालयाकडून रिजेक्ट करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case
Walmik Karad: महादेव मुंडेंना कराडच्या लोकांनी मारलं अन् मानेचा तुकडा आणला, वाल्मिकच्या सहकाऱ्याचा थरारक खुलासा|VIDEO

वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केले होते. यानंतर आजच्या सुनावणीत सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये जोरदार विरोध केला. ते म्हणाले, " हे प्रकरण चार्ज फ्रेम केले पाहिजे. प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या दिवशी दोष मुक्तीचा अर्ज सादर करेल आणि पुन्हा न्यायालयामध्ये जाईल. यामध्ये खूप मोठा वेळ जात असून हे प्रकरण चार्ज फ्रेम व्हायला हवा आहे. " असं सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे. दरम्यान दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पुढील सुनावणी ही ४ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. दरम्यान या हत्येतील आरोपींना शिक्षा कधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com