Gotya Gite Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: मारण्याआधी घरासमोर नैवेद्य ठेवायचा अन् दुसऱ्या दिवशी...; वाल्मीक कराडचा समर्थक 'गोट्या'चा नवा कारनामा; धक्कादायक VIDEO समोर

Gotya Gite Video: वाल्मीक कराडचा समर्थक आणि सराईत गुन्हेगार गोट्या गीतेचा नवा कारनामा समोर आला आहे. त्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एखाद्याची हत्या करण्याआधी त्या व्यक्तीच्या घरासमोर तो नैवेद्य ठेवायचा अन् दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची हत्या करायचा असा त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • गोट्या गीते हा वाल्मीक कराडचा समर्थक असून अनेक हत्यांमध्ये त्याचा सहभाग आहे

  • तो नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी हत्या करतो, असा धक्कादायक व्हिडीओ समोर आला.

  • महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातही गोट्या मुख्य आरोपी आहे, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

  • नागरिक पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत असून गोट्याला अटक का होत नाही? याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

योगेश काशिद, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा समर्थक गोट्या गीतेचा नवा कारनामा समोर आला आहे. गोट्या गीते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. गोट्या गीतेवर बीड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्या व्यक्तीला मारायचं आहे. त्या व्यक्तीच्या घरासमोर तो नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा कार्यक्रम करायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आला आहे.

बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार ज्ञानोबा उर्फ गोट्या गीते हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात गोट्या हा संशयित आरोपी आहे. महादेव मुंडे यांची हत्या गोट्या गीतेनेच केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र याच ज्ञानोबा उर्फ गोट्या गीतेचा नवीन कारनामा समोर आला आहे. त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

राम नाम सत्य हैं राम नाम सत्य है असं म्हणत ज्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. त्या व्यक्तीच्या घरासमोर तो नैवेद्य ठेवायचा. त्यानंतर त्या व्यक्तीचा कार्यक्रम करायचा, असा गोट्याचा धंदा आहे. याच गोट्या गीतेचा एका व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवताचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याचे अशाप्रकारचे दहशत माजवतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. हातामध्ये रिवाल्वर आणि लोकांना धमकावत असल्याचा त्याचा व्हिडीओ देखील समोर आला.

गोट्या गीते हा सराईत गुन्हेगार असून तो महादेव मुंडे यांची हत्याकांड प्रकरणातील आरोपी असून देखील तो बीड पोलिसांना सापडत नाही. गोट्या गीतेचे अनेक हत्यांच्या मालिकेमध्ये नाव आहे. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी असल्याचे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक वेळा त्याच्यावरती आरोप केले आहेत. मात्र तो सराईत गुन्हेगार असूनही पोलिस त्याला का अटक करत नाहीत? हा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayurvedic Kadha Recipe : हिवाळ्यात सर्दी - खोकल्यापासून राहाल दूर, रोज प्या 'हा' आयुर्वेदिक काढा

Gratuity Calculation: पगार ₹५०,०००... तर १, २, ३ आणि ४ वर्षानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Blood Pressure Impact: नॉर्मल ब्लड प्रेशर असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक? धडकी भरवणारा संशोधनाचा दावा समोर!

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Maharashtra politics : चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT