Wall collapsed in Amravati अमर घटारे
महाराष्ट्र

Amravati: 'देव तारी त्याला कोण मारी' अख्खं घर उध्वस्त झालं, पण अलार्मने दिलं जीवनदान

Wall collapsed in Amravati: अलार्ममुळे त्यांची झोप उघडली आणि अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंतीचा काही भाग पडत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती: अमरावती जिल्ह्यात (Amravati) गेल्या ४ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथे सततच्या पावसामुळे (Heavy Rain) एक घर जमीनदोस्त झाले आहे. चुकीने लागलेला अलार्म (Alarm) वाजल्यामुळे कुटुंबाचा जीव वाचला आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय या कुटुंबाला आला आहे. (Amravati Latest News)

सारंगधर शामराव लांजेवार आणि त्यांची पत्नी हे दोघे चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथील एका कुटुंबात राहतात. त्यांचे दोन खोल्यांचे टीन - मातीचे घर आहे. त्यांची लग्न झालेली २५ वर्षीय मुलगी व जावई हे ५ महिन्याच्या मुलीसह गावात आले होते. जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपी गेले होते. दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत (Wall) जीर्ण झाली होती.

अशातच झोपल्यानंतर मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या जावईचा अलार्म वाजला. मात्र तो अलार्म चुकीने लागला होता. अलार्ममुळे त्यांची झोप उघडली आणि अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंतीचा काही भाग पडत आहे. यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना हाक मारली आणि उठवून लगेच सर्वांना घराबाहेर काढले.

यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटातच ते ज्या खोलीत झोपले होते ती खोली पूर्णतः जमीन दोस्त झाली. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. चुकीने लागून वाजलेल्या अलार्ममुळे सदर कुटुंब बचावले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT