शिंदेंचे नाव बदलून श्रीमान 'खापरफोडे' ठेवायला हवे; वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी सामनातून हल्लाबोल

महाराष्ट्रात होणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे समोर आले आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे समोर आले आहे. यावरुन आता शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आज शिवसेनेचे (ShivSena) मुखपत्र असलेल्या सामना'मधूनही जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत येण्याअगोदर वेदांत-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरल्पासाठी लागणारी आवश्यक ते प्रयत्न ठाकरे सरकारने केले होते, पण आता शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकल्पासाठी लागणारी पुर्तता केली नसल्याचा आरोप होत आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Corona Update: जगातून कोरोना संपणार का? WHOचे प्रमुख, म्हणाले...

वेदांता – ‘फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. त्यांना ‘फॉक्सकॉन’प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातला शेती उद्योग खतम करायचा आहे. त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचे आहे. शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे. महाराष्ट्राने डोळे उघडे ठेवून पावले टाकायला हवीत, असंही अग्रलेखात म्हटले आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार

काय म्हटले आहे अग्रलेखात

महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. तरीही वेदांता-फॉक्सकॉन हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. पुण्याच्या तळेगावजवळ 1100 एकर जमीन व इतर सवलती या उद्योगास देण्याचे महाविकास आघाडी सरकारने मान्यच केले होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल असे कंपनीचे पक्के वचन होते. जूनपर्यंत तरी कंपनीचे मन बदलले नव्हते, पण महाराष्ट्रात एक बेकायदा सरकार विराजमान होताच किमान 1 लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिष्ठsवर हा खूप मोठा हल्ला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा नुकताच पैठण दौरा झाला. त्यांच्या गटाचे आमदार भुमरे यांचा हट्ट पुरविण्यासाठी मुख्यमंत्री पैठण यात्रेस गेले. तेथे एका मंडपात मुख्यमंत्र्यांची पेढे व लाडवांची तुला करण्याची योजना होती. त्यासाठी अनेक खोके भरून मिठाई तेथे आणली होती.

शिंदे गटाचा खोक्यांशी संबंध जोडला जात असला तरी खोक्यातली मिठाई पाहून ‘तुला’ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी नाकारले. त्यांनी मिठाईतुला नाकारताच त्या मांडवात जमलेल्या लोकांनी लाडू-पेढय़ांची अक्षरशः लूटमार केली. लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या डोळय़ांसमोर लाडू-पेढे पळवून नेले. अगदी त्याच ‘लूटमार’ पद्धतीने गुजरातने महाराष्ट्रातला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पळवून नेला आहे. याआधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातने असेच पळवून नेले. आता फॉक्सकॉन हातचे गेले. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. मग हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. मग दोन वर्षे काय फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे व्यस्त होते? इतक्या मोठय़ा प्रकल्पाविषयी दिरंगाई होत आहे याविषयी त्यांनी तोंडातून ‘ब्र’ काढल्याची नोंद कोणत्याही कॅबिनेट बैठकीत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com