Waghnakh Opening Ceremoy Saam Digital
महाराष्ट्र

Waghnakh Opening Ceremony : ' काहींच्या मेंदूला बुरशी'; वाघनखांवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला, CM शिंदेंनीही टोचले कान

CM Eknath Shinde On Waghnakh : साताऱ्यात आज शिवाजी महाराज संग्रहालयात वाघ नखांचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

Sandeep Gawade

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्य स्थापनेत वाघनखांचा वाटा मोठा आहे. कारण याच वाघनखांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी ठार केलं होतं. आज कित्येक दशकांनतर ही वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, मात्र विरोधक याचं राजकारण करत आहेत. वाघनखाचं राजकारण करणं म्हणजे महाराजांच्या विरतेचा अपमान करणं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं.

सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं अगदी वेळेवर आणली आहेत. वेळेवर म्हणजे वेगळा विचार करू नका, असं मिश्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले. आपण त्यांच्या बद्दल बोललं म्हणजे वाघनखं जास्त वेळ आपल्याकडे राहतील. वाघनखं आल्यानंतर बाहेर देखील पाहत होतो सर्वाच्या चेहऱ्यावर एक आनंद पहायला मिळत होता. मात्र काही लोकांना यावरूनही राजकारण करायचं असतं, हे दुर्दैव आहे. वाघनखांना विरोध म्हणजे विरतेचा अपमान करणे आहे.

शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघनखं म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. वाघनखं आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे आणि विरतेचे दर्शन होईल. ही वाघनखे आपल्या मराठी भूमीत दाखल झाली आहेत. सुधीर भाऊ लंडनमध्ये गेले याचमुळे याचं दर्शन आज झालं.

अफजल खानाचा वध ही साधी सुधी घटना नव्हती, तो पराक्रम आणि शूरता ही आपल्या डोळ्यासमोर आहे. शिवाजी महाराज यांनी मुघलांना नेस्तनाभूत केले. हिंदवी स्वराज्य घडवणे हा शिवाजी महाराज यांचा ध्यास होता. शिव छत्रपतीच्या गनिमी काव्याने अवघ्या जगाने प्रेरणा घेतली. त्यांची शिकवणूक आणि प्रेरणा आपण अमलात आणली पाहिजे.

जी वाघनख अनेक वर्ष लंडन च्या म्युझियममध्ये होती ती भारतात आली आहेत. आपल्या देशात काही लोकांना वाद करने हा एकमेव धंदा आहे. हा रोग आजचा नाही त्यांचा सामना छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील करावा लागला. काहींच्या मेंदूत बुरशी आली त्यांची बुरशी काढण्याचे काम करा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT