America Elections 2024
America Elections 2024Saam Digital

US Presidential Election: मोठी बातमी! अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा ट्विस्ट, जो बायडेन माघार घेणार?

America President Election Update : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे आणि त्यांच्या कारकीर्दीवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे, त्यामुळे बायडेन अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.
Published on

अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकांची धामधूम सुरूअसून निवडणूक प्रचारात मोठा ट्विस्ट आला आहे. जो बायडेन यांना कोरोनाची लागण, डोनाल्ड ट्रम्प या्ंच्यावरील प्राणघातक हल्ला आणि बाडयेन यांची कारकीर्द यामुळे डेमोक्रॅटीक पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन आमनेसामने आहेत. मात्र बायडेन निवडणुकीच्या शर्यतीतून कोणत्याहीक्षणी बाहेर पडतील अशा बातम्या येत आहेत, त्यामुळे जगाचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.

America Elections 2024
Breaking News: जगभरातील विमानसेवा विस्कळीत! बँका, शेअर मार्केटचे काम ठप्प, बुकिंग, चेक- इन होईना; नेमकं काय झालं?

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव आणला जात आहे. अलीकडेच बायडेन निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडलतील अशा बातम्या येत होत्या. या बातम्या आता सत्य होतील अशी शक्यता आहे आणि या रविवारीच म्हणजे २१ जुलै रोजी बायडेन याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 81 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातचं त्यांना कोरोनाची लागन झाली आहे. ते संध्यो कॉरंटाईन आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारातही भाग घेऊ शकत नाहीत डॉक्टरांनीही त्यांना जास्त बोलण्यास मनाई केली आहे, त्यामुळे बायडेन यांच्या निवडणूक प्रचारात खंड पडला आहे, ज्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना फायदा होऊ शकतो.

America Elections 2024
Neet Exam Issue: नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; पटनानंतर रांची कनेक्शन समोर, RIMS चा विद्यार्थी ताब्यात

काही दिवसांपूर्वी बायडेन यांनी एका मुलाखतीत, जर एखाद्या डॉक्टरने त्यांना थेट सांगितले की त्यांचं स्वास्थ चांगलं नाही, तर ते अध्यक्षपदाबाबत पुनर्विचार करतील. बायडेन यांच्या कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवाय रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळे अमेरिकन जनतेचा ट्रम्प यांना पाठिंबा वाढला आहे. या सर्व परिस्थितीमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही बायडेन यांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडे चिंता व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com