pandharpur, vitthal sahakari sakhar karkhana, Abhijeet Patil  saam tv
महाराष्ट्र

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष निवडीत घडला इतिहास; अभिजीत पाटील अध्यक्ष

या कारखान्याच्या 45 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (pandharpur) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (vitthal sahakari sakhar karkhana) अध्यक्षपदी अभिजीत पाटील (abhijeet patil) यांची तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे (premlata ronge) यांची आज (गुरुवार) बिनविरोध निवड झाली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) इतिहासात प्रथमच उपाध्यक्षपदी महिलेला संधी मिळाल्याने महिला (women) वर्गात चैतन्याचे वातावरण हाेते (pandharpur latest marathi news)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणुक नुकतीच झाली हाेती. या निवडणुकीत सत्ताधा-यांचा पराभव झाला हाेता. आज कारखान्याच्या नूतन संचालकांची कारखाना कार्यस्थळावर बैठक झाली. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही निवडणुक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत झाली. (vitthal sahakari sakhar karkhana)

या कारखान्याचे नूतन अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला विठ्ठल साखर कारखाना एक ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे. किमान बारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी देणार आहाेत. महिला सभासदांसाठी विशेष योजना राबवली जाईल असेही नुतन उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे यांनी नमूद केेलं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT