sangli crime news, vita police, satara, solapur saam tv
महाराष्ट्र

विटा पोलिसांची दमदार कामगिरी, ५ घरफोड्या उघडकीस; सातारा, सांगलीतील युवक अटकेत

तिन्ही संशयित आराेपींकडून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी आपला कारवाईचा धडाका कायम ठेवत आजही धडाकेबाज कामगिरी केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पदमा कदम व पोलिस निरिक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पाेलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल दहा लाखांचा मुद्देमल हस्तगत केला आहे. (Sangli Crime News)

सांगलीच्या तासगाव, विटा (vita), औध, उंब्रज, पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना विटा पोलिसांनी कडेगाव येथे रंगेहाथ पकडले. पाेलिसांनी अटक केलेल्यांची नावे नयन जाधव, गौतम माळी, अनिकेत गायकवाड अशी आहेत.

या प्रकरणातील अटक केलेले दोन संशयित आरोपी हे सातारा (satara) जिल्ह्यातील आहेत. तसेच एक संशयित आराेपी हा सांगली (sangli) जिल्ह्यातील आहे. गेल्या काही दिवसांपासून या तिघांनी घरफाेडी, चाेरी असे गुन्हे केले आहेत. या तिघांकडून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस निरिक्षक संतोष डोके यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart cancer: होय, हृदयाचा कॅन्सरही होऊ शकतो; कोणाला असतो जास्त धोका? वाचा

Bihar Election 2025 : अख्खा गेम फिरणार? १०७ जागा निकाल बदलणार, कारण....

Tilgul Ladoo Benefits: थंडीत रोज एक तिळगूळ लाडू खा, कॅल्शियम वाढेल अन् हाडं होतील मजबूत

Indurikar Maharaj: 'मला बोला, माझ्या मुलीचा काय दोष?' ग्यान देणारे इंदोरीकर कीर्तन सोडणार?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी पात्रता काय? कोण करु शकणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT