Pune Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Pune Crime News: हातात कोयता, खिशात ५-६ मोबाईल; दहशत करायला निघाला अन् थेट पोलीस कोठडीत पोहचला

Pune Crime News Today 7 June: पुण्यात सराईत चोरट्याकडून विश्रांतवाडी पोलिसांनी वाहनचोरीसह मोबाईल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहे.

Shivani Tichkule

अक्षय बडवे

Pune Crime News Today: पुण्यात सराईत चोरट्याकडून विश्रांतवाडी पोलिसांनी वाहनचोरीसह मोबाईल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुलतान उर्फ हाफिज मोहम्मद शेख याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

या सराईत आरोपीवर शहरात यापूर्वी 20 गुन्हे दाखल असून विश्रांतवाडी पोलिसांनी (Police) आणखी सात गुन्हे तपासात उघड केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी पुण्यातील (Pune) शांतीनगर येथील रस्त्यावर दुचाकी वरील एक इसम हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो पूर्व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याजवळ एक लोखंडी कोयता, पाच मोबाईल, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune News)

सुलतानवर यापूर्वीचे एकूण वीस गुन्हे दाखल. त्याच्याजवळ 14 वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल, एक दुचाकी असा एकूण 1 लाख 60 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सुलतानवर यापूर्वीचे एकूण 20 गुन्हे दाखल असून विश्रांतवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात विमानतळ, भारती विद्यापीठ, बिबेवाडी पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी एक, तर लोणीकंद मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडे दोन असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याजवळ मिळालेली दुचाकी हीदेखील बिबवेवाडी येथून चोरी केल्याचे त्याने कबूल केले. (Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT