Maharashtra Politics: ठाण्यात भाजप विरुद्ध ठाकरे गट लढत? शिंदे हक्काचा मतदारसंघ भाजपला सोडणार असल्याची चर्चा

Maharashtra Political News: राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे हे भाजपला सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Amit Shah
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Amit ShahSaam TV

रुपाली बडवे, साम टीव्ही

Maharashtra Political News: राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे हे भाजपला सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर शिंदे हा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ठाण्यात आता भाजप विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाण्याचा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय निर्णय झाला आहे. त्यामुळे सध्याचे खासदार राजन विचारे हेच पुन्हा रिंगणात उतरतील, हे स्पष्ट झालं आहे. पण पूर्वीचा दाखला देत ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील हा मतदारसंघ मिळावा म्हणून भाजपने जोर लावला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Amit Shah
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या टप्प्यात इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार!

त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केलेली नसल्याने हायकमांडकडूनच त्यांना शब्द टाकण्याची तयारीही भाजपकडून सुरू आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. प्रकाश परांजपे यांच्यापासून राजन विचारेंपर्यंत हा गड शिवसेनेकडे राहिला.

त्यापूर्वी या गडावर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी गाजवलेला हा गड शिवसेनेसोबतच्या मैत्रीत भाजपने (BJP) सोडला, पण गेल्यावर्षीच्या सत्तांतरानंतर शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने पुन्हा या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे.

भाजपकडून राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ठाण्यातील आमदार संजय केळकर आणि संजीव नाईक यांची नावे चर्चेत आहेत. नाईक येथे निवडणूक लढवून विजयी झाले होते. सहस्त्रबुद्धे दीर्घकाळ स्पर्धेत असले, तरी त्यांचा जाहीर वावर कुठे दिसलेला नाही. (Maharashtra Political News)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Amit Shah
Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; शिवसेना भवनातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

सध्या ठाणे लोकसभेतील तिन्ही महापालिकांत प्रशासकीय राजवट आहे. तेथे राज्य सरकारकडून म्हणजेच शिंदे-फडणवीस यांच्या सूचनेनुसारच कामे होत आहेत. तेथील ठाकरे गटाची रसद थांबली आहे. त्यामुळे विचारे यांची दिलदारी आणि उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल सामान्य मतदारांत असलेल्या सहानुभूतीवरच त्या पक्षाची भिस्त आहे.

मतांचे गणित नेमके कसे असेल?

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती आणि मोदी लाटेचा फायदा विचारे यांना मिळाला. त्यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली. आता राष्ट्रवादीने माघार घेतल्याने त्याचा फायदा विचारे यांना होऊ शकतो, पण शिवसेनेतील फुटीचा, भाजप सोबत नसल्याचा फटकाही विचारे यांना बसू शकतो.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com