vishal agarwal detail inquiry will open many political facts says prakash ambedkar Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: ...तर विशाल अग्रवालला वाचवणारी नावे समाेर येतील : प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar statement on pune kalyaninagar accident : विशाल अग्रवाल याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा आराेप हाेताेय. प्रकाश आंबेडकर यांनी देखील अग्रवालच्या चाैकशी सगळं समजेल असे म्हटलं.

Siddharth Latkar

- अक्षय सावकार

पुण्यातील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल याच्यासोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागीदारी आहे? यासोबतच अग्रवालनं कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला? याचा खुलासा झाला तर पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातामधील संशयितांना वाचवणारी सर्वच नाव समोर येतील असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकाेला येथे नमूद केले.

प्रकाश आंबेडकर पुढं बाेलताना म्हणाले डॉ. जोंधळे यांना मारणाऱ्या लोकांचा शोध घेतला तर अनेक नवीन खुलासे होतील. या प्रकरणात सध्या अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर बाेलणे प्रकाश आंबेडकर यांनी टाळले.

ते म्हणाले सध्या पोलिस सांगतात त्याच नावांवर विश्वास ठेवावा लागेल. दरम्यान बेदरकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात नवा कायदा जोपर्यंत होत नाहीय तोपर्यंत अशी प्रकरण घडतच राहतील असेही आंबेडकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT