Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : दुरुस्तीचे काम करताना घडली भीषण दुर्घटना; वीज प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा मृत्यू, तिघे जखमी

Virar News : महावितरणकडून लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अर्नाळा परिसरात दुरुस्ती करण्यासाठी जयेश या तरुणासह काही वायरमन आले होते. यावेळी जयेश हा खांबावर चढला होता

Rajesh Sonwane

मनोज तांबे 

विरार : महावितरणकडून सध्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली असून यात विजेचा जोरदार झटका बसल्याने एका वायरमनचा मृत्यू झाला आहे. तर तीन वायरमन जखमी झाले आहेत. सदरची घटना विरारच्या अर्नाळा परिसरात दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विरारच्या अर्नाळा परिसरात घडलेल्या घटनेत जयेश घरत (वय २८) असे मृत झालेल्या वायरमनचे नाव आहे. दरम्यान महावितरणकडून लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अर्नाळा परिसरात दुरुस्ती करण्यासाठी जयेश या तरुणासह काही वायरमन आले होते. यावेळी जयेश हा खांबावर चढला होता. सोबत तिघेजण देखील होती. दुरुस्तीचे काम असल्याने येथील वीज पुरवठा बंद करण्यात आलेला होता. 

वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने घडली घटना 

जयेश यांच्यासह तिघे वायरमन खांबावर चढून काम करत होते. यावेळी परिसरात बंद करण्यात आलेला वीज पुरवठा अचानकपणे सुरु झाला. यामुळे विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने जयेश याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले तीन वायरमन जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींना लागलीच विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनेने परिसरात खळबळ 

दरम्यान विद्युत लाईनवर दुरुस्तीचे काम सुरु असल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र काम सुरु असतानाच अचानक वीज पुरवठा सुरु झाला कसा? असा प्रश्न घटनेमुळे उपस्थित होत आहे. दरम्यान यात महावितरणचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT