Sambhajinagar : सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला; पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई करत तिघेजण ताब्यात

Sambhajinagar News : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या बाहेर एक व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तात्काळ बँकेच्या ठिकाणी गेले असता एकजण दिसून आला
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगावमध्ये दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांच्या कारवाईमुळे आणखी एक सशस्त्र दरोडा टळला आहे. शिल्लेगाव पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करीत तीन दरोडेखोरांना पकडल्याने शिल्लेगाव परिसरातील जिल्ह्यातील आणखी एका दरोड्याची घटना टळली आहे. 

रात्रीच्या अंधारात चोरटे संधीचा फायदा घेत चोरी करत असतात. बंद घरांना हेरून किंवा घरातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकत असतात. दरम्यान गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या बाहेर एक व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत सदर बँकेच्या ठिकाणी गेले असता एकजण दिसून आला. 

Sambhajinagar News
Shahada Accident : कार- डंपरचा भीषण अपघात; कार थेट शेतात जाऊन कोसळली, एकाचा जागीच मृत्यू

शंभर गुन्ह्यांची कबुली 

यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून रेकी करणाऱ्या चोरट्याला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आत्तापर्यंत १०० गुन्हे केले असल्याचे कबूल केले. तर त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, कात्री, गलूल, सोलापूर येथून चोरलेली दुचाकी, स्क्रू ड्राइवर, ब्लूटूथ हेडफोन आदी मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याचे अन्य दोघा साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Sambhajinagar News
Bhandara : भंडाऱ्यात वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई; ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

बँकेत सुरक्षा रक्षकही नाही 

दरम्यान स्टेट बँकेत सध्या सुरक्षेचेही धिंडवडे उडालेले दिसून येत आहे. कोट्यावधी रुपयांचा व्यवहार असलेल्या या बँकेत साधा सुरक्षा रक्षक तैनात नाही. त्यामुळे संशयित चोरटे बँकेत रेकी करत असल्याची पुसटशी कल्पना बँक प्रशासनाला नव्हती. मात्र शिल्लेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरीची घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com