Bhandara : भंडाऱ्यात वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई; ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

Bhandara News : वाळू माफियांवर लगाम लावता यावा, यासाठी राज्य सरकारने नुकताच नवीन वाळू धोरण राज्यात लागू केले आहे. यानंतर भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई झाली आहे
Bhandara News
Bhandara Newssaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : अवैध वाळू वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यात राज्य सरकारच्या वाळू धोरणानंतर भंडाऱ्यात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या १० पेक्षा अधिक डंपरवर कारवाई करत ५ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

वाळू माफियांचा हैदोस मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आला आहे. बंदी असताना देखील चोरटी वाळू वाहतूक केली जात असते. तर कारवाईसाठी गेलेल्या पथकांवर देखील कारवाई करण्यात येत असल्याचे अनेकदा पाहण्यास मिळत आहेत. दरम्यान या वाळू माफियांवर लगाम लावता यावा, यासाठी राज्य सरकारने नुकताच नवीन वाळू धोरण राज्यात लागू केले आहे. यानंतर भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई झाली आहे. 

Bhandara News
Banana Crop : वादळी वाऱ्याने केळीचे पीक जमीनदोस्त, सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पोलीस, महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई 

राज्य सरकारच्या वाळू धोरणानंतर वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळताना भंडारा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्वतः रस्त्यावर उतरत ही कारवाई केली आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं संयुक्तरीत्या केलेली ही भंडाऱ्यातील मागील काही दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई समजल्या जाते.

Bhandara News
Shahada Accident : कार- डंपरचा भीषण अपघात; कार थेट शेतात जाऊन कोसळली, एकाचा जागीच मृत्यू

५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 

दरम्यान भंडाऱ्याच्या गोपेवाडा येथे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १० पेक्षा अधिक टिप्परवर ही कारवाई केली असून यात ८० ब्रास पेक्षा अधिक वाळूसाठा आणि टिप्पर असा ५ कोटींचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com