Kolhapur latest update on two group clash Saam TV Marathi News
महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये रात्री दंगल; जाळपोळ, दगडफेक अन् गाड्यांची तोडफोड

Kolhapur Siddharth Nagar communal clash news today कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर कमानीजवळ शुक्रवारी रात्री दंगल उसळली. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापनदिनाच्या फलक व साऊंड सिस्टमवरून वाद झाला होता. त्यातूनच दोन गटांमध्ये दगडफेक व जाळपोळ झाली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगरात दोन गटांत भीषण दंगल उसळली.

  • दगडफेक, जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड झाली.

  • पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • वादाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण फलक वर्चस्व आणि फुटबॉल क्लबच्या वर्धापनदिनावरून वाद झाल्याचे बोलले जातेय.

Kolhapur latest update on two group clash : कोल्हापूरमध्ये सिद्धार्थनंगरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण झाली असून शुक्रवारी रात्री दंगलीत रूपांतर झाले. दोन गटात तुफान दगडफेक, जाळपोळ अन् गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या सिद्धार्थ नगर कमानीजवळ दोन गटात तुफान दगडफेक झाली. चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आलं. काही वाहने पेटवून देण्यात आली. सिद्धार्थ नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. एकमेकांवर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दगडफेकीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकातील कमानी जवळ शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली आहे. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांमध्ये अनेक दिवस वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापनदिना निमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यात आले होते. यावरून दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता. तसेच या चौकात वर्चस्व कुणाचं यावर देखील अनेक वर्ष इथल्या तरुणांमध्ये वाद आहे.

शुक्रवारी सायंकाळी हा वाद उफाळून आला. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांवर तुंबळ दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी संतपलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक मागून जमावावर नियंत्रण आणलं. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होत असल्याने हा वाद अधिक तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही जमावला पांगवलं. तर काहींना ताब्यातही घेतलं आहे. हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत. सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात चोरट्यांनी धाडसी चोरी करत पाच तोळे सोन्यासह केली रोकड लंपास

बैलांसमोर नाचवल्या नर्तिका, ग्रामपंचायतीच्या छतावर डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीताच्या घटास्फोटवर वकिलाचा मोठा खुलासा; म्हणाले...

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

Ganesh Chaturthi 2025 : सुखकर्ता, दु:खहर्ता...; गणपतीच्या 'या' ५ आरत्या आताच करा तोंडपाठ

SCROLL FOR NEXT