Vinayak Raut :  Saam tv
महाराष्ट्र

Vinayak Raut : लोक फसले आणि त्यांच्याकडून चूक झाली; पराभवानंतर विनायक राऊत यांनी सांगितली मन की बात

Vinayak Raut on ratnagiri-sindhudurg lok sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पराभव माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. पराभवानंतर विनायक राऊत यांनी नाव न घेता नारायण राणेंना लक्ष्य केलंं.

Vishal Gangurde

विनायक वंजारे, साम टीव्ही प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंनी मोठ्या मताधिक्यांनी विनायक राऊत यांना पराभूत केले. या पराभवानंतर विनायक राऊत यांनी मन की बात सांगितली. 'कोट्यवधी रुपयांचं वाटप झालं. त्यामुळे लोक फसले आणि लोकांकडून चूक झाली, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर विनायक राऊत यांनी दिली.

२०१४ आणि २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी विजय प्राप्त केला होता. यंदाही लोकसभा निवडणूक जिंकेल, असा विश्वास विनायक राऊत यांना होता. मात्र, यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंनी विनायक राऊतांना पराभवाची धूळ चारली. या पराभवामुळे विनायक राऊतांना धक्का बसला.

या पराभवावर भाष्य करताना विनायक राऊत म्हणाले, 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तालुक्या-तालुक्यात बैठका घेऊन पराभवाची कारणं शोधत आहोत. या बैठकीला शिवसैनिकासोबत इंडिया आघाडीचे कार्यकर्तेही सोबत आहेत. त्यांच्या मनात खूप उत्साह होता. मी जेवढं पराभवाने निराश झालो नाही, त्यांच्या अनेक पटीने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं नैराश्य दूर झटकून कामाला लागा, असं सांगायला आलो आहे.

'पराभवाचं खापर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांवर फोडणार नाही. कोट्यवधी रुपयांचं वाटप झाल्यामुळे लोक फसले. लोकांकडून चूक झाली. तरीही मी आभारी आहे. चार लाखांपेक्षा अधिक मते मला मिळाली. या मतदारांनी विश्वास दाखवला आहे, असे राऊत पुढे म्हणाले.

दरम्यान, कणकवलीत शिंदे गटाने 'वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, अशा आशयाच बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरही विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'वक्त आने दो, इसके उपर बात करुंगा, असा मिश्किल टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT