MVA Press Conference: PM मोदींच्या सभा आमच्या फायद्याच्या..., महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांची जोरदार टोलेबाजी, VIDEO

Sharad Pawar Criticized PM Modi Vidhan Sabha Election: महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आहे. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
MVA Press ConferenceSaam Tv
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या आणि त्यांचा एक रोड शो देखील झाला. त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना फायदाच झाला. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या जेवढ्या सभा होतील, तेवढा फायदा आम्हाला होईल, असा खोचक टोला शरद पवार यांनी मोदी यांना लगावला. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

शरद पवार नेमकं काय बोलले?

राज्यात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा (MVA Press Conference) झाल्या, तिथं आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या तर आमच्या फायद्याच्या ठरतील, असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. तर मतदारांनी मतांच्या माध्यमातून संदेश दिल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला. तसंच सोडून गेलेल्यांना परत घेणार नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. (Sharad Pawar Criticized PM Modi ) जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं पवार म्हणाले. विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या मोदींच्या जेवढ्या सभा होतील, तेवढं बहुमत मिळेल. म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. (Vidhan Sabha Election) तर धार्मिक धृवीकरण झालं, पण त्याला यश मिळालं नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
Special Report: Sharad Pawar यांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! पवारांचा सत्ता बदलाचा नारा

महाविकास आघाडीची आज, शनिवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरला संयुक्त पत्रकार परिषद झाली. (Mahavikas Aghadi Press Conference) या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी संबोधित केलं. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजची पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
Sharad Pawar: आता आम्ही ठरवलंय सरकार हातात घ्यायचं, शरद पवारांचं मोठं विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com