vinayak raut statement on uday samant and narayan rane banner Saam Digital
महाराष्ट्र

Konkan Politics: राणे-सामंतांच्या बॅनर वाॅरवरुन विनायक राऊतांचा चिमटा (पाहा व्हिडिओ)

vinayak raut statement on uday samant and narayan rane banner: वक्त आने दो ...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा कणकवलीत बॅनर लागला हाेता. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो हाेता. बाप बाप हाेता है! अशा आशयाचा बॅनर नारायण राणे समर्थकांनी लावला हाेता.

अमोल कलये

राणे आणि सामंत यांच्यामधील वाद हा इटूकले-पिटुकले असा आहे अशी खाेचक प्रतिक्रया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे. मी त्यांच्या बॅनरबाजीच्या वादाला फार किंमत देत नाही असेही राऊत यांनी म्हटले.

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काेकणात बॅनरबाजीला ऊत आला आहे. विशेष म्हणजे ही बॅनरबाजी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु आहे. एकीकडे उद्याेगमंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्ते तर दूसरीकडे भाजप खासदार नारायण राणे यांचे कार्यकर्ते बॅनरबाजी करीत आहेत. यामधून दाेन्ही गट अप्रत्यक्षरित्या एकमेकांना टाेला लगावात असल्याची चर्चा आहे.

या बॅनरबाजी बद्दल माजी खासदार विनायक राऊत यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले राणे आणि सामंत यांच्यामधील वाद हा इटूकले-पिटुकले असा आहे. त्यामुळे मी फार त्यांना किंमत देत नाही. बॅनरबाजीच्या प्रकारावर माझा कधी विश्वास नसतो. बॅनरबाजी करण्यापेक्षा रणांगणात उतरून विकासात्मक स्पर्धा करण्याची आवश्यकता असते असेही विनायक राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT