vinayak raut, uday samant, deepak kesarkar, ratnagiri, maharashtra politics. saam tv
महाराष्ट्र

'खरेदी विक्रीच्या बाजारत जे आमदार विकले गेले त्यांची आम्हांला अजिबात चिंता नाही'

खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी जिल्हा दाै-यावर आले आहेत.

अमोल कलये

रत्नागिरी : शिवसेना पक्ष मजबूतीने उभा आहे. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारत विकले गेले त्याची आम्हांला अजिबात चिंता नाही. सन 1966 कालावधीतील शिवसेना आहे. हे गृहित धरुन आम्ही पुन्हा शिवसेनेची उभारणी करणार आहाेत. मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनता शिवसेनेचे शंभर आमदार निवडून देतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला. (vinayak raut latest marathi news)

खासदार विनायक राऊत म्हणाले रत्नागिरी (Ratnagiri) येथील शिवसेना (Shivsena) ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आहे. ज्यांनी सेनेतून बंडखाेरी केली त्यांचा हिशाेब जनताच करेल. एका प्रश्नास उत्तर देताना राऊत म्हणाले उदय सामंत यांनी शिवसेना वाढविली नाही तर शिवसेनेने उदय सामंत यांना वाढविले.

उदय सामंत म्हणजे आयत्या बिळातील नागोबा म्हणावे लागेल. त्यांना शिवसेनेत आहे असे म्हणण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले रत्नागिरीतील शिवसेना भक्कम आहे. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारत विकले गेले त्याची आम्हांला अजिबात चिंता नाही.

मध्यावधी निवडणुका झाल्यास आम्हांला खात्री आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शंभर आमदार महाराष्ट्रातील जनता निवडून देईल असा विश्वास देखील खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

Mumbai Rain: मुंबई पावसाने ठप्प : सांताक्रूझमध्ये रस्ते पाण्याखाली, वाहनचालकांची मोठी तारांबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Nanded News: छाती इतक्या पाण्यातून बैलगाडीतून जीवघेणा प्रवास, नांदेडमध्ये शेतकर्‍यांवर अस्मानी संकट, पाहा व्हिडिओ

Shocking News : पुणे हादरलं! अल्पवयीन मुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या

SCROLL FOR NEXT