INDvsENG : विराट-v वाद रंगतोय मैदानाबाहेरही; जिमी नीशमचे ट्विट ठरतयं कारण

विराट कोहली आणि इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो एकमेकांना काल वाद झाल्याचा पाहायला मिळाला.
INDvsENG
INDvsENGSaam Tv

नवी दिल्ली: क्रिकेटच्या सामन्यात खेळाडूंचे कधीही वाद होऊ शकतात. भारताचा संघ ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड दौर्‍यावर असो वाद होत असतात. कसोटी सामन्यादरम्यान तर हमखास वाद होत असताता. असाच वाद काल भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाहायला मिळाला. विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो या दोघांत काल वाद झाल्याचा पाहायला मिळाला. यामुळे मैदानावरील वातावरण काहीवेळ तापले होते. पंचांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. (INDvsENG 2022 )

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा डाव सुरु होता. यावेळी सुरुवातील फलंदाजीसाठी जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स मैदानावर आले. डाव सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद शमीच्या षटकात विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात काही संवाद झाला. मोहम्मद शमीचा एक चेंडू जॉनी बेअरस्टोने मारला, त्यानंतर स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणारा विराट कोहली काहीतरी बोलताना दिसला.

INDvsENG
Maharashtra Rain Update: राज्यातील १४ जिल्ह्यांत अलर्ट; NDRF ला सतर्कतेचा इशारा

विराट कोहलीने यावेली केलेल्या इशाऱ्यावर फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने प्रत्युत्तर दिले. बेअरस्टोच्या या कृतीनंतर विराट कोहली बेअरस्टोच्या दिशेने जावू लागला. यावेळी या दोघांत जोरदार वाद झाला. या वादाचा आवाज बाहेरही येत होता. यात विराट कोहली (Virat Kohli) बेअरस्टोकला, 'मला काय करायचे ते सांगू नकोस, तोंड बंद करून फलंदाजी कर' अस म्हणताना दिसत आहे.

मोहम्मद शमीचे षटक संपल्यानंतर पुन्हा या दोघांत संवाद सुरु झाला. पण यावेळी दोघही हसताना दिसले. जॉनी बेअरस्टोनने शानदार खेळी केली. इंग्लंड टीमकडे जॉनी बेअरस्टो हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने या सामन्यात शतक केले आहे.

INDvsENG
IND vs ENG : ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने केले 'हे' पाच मोठे विक्रम

तिसऱ्या दिवसाचा डाव संपल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जॉनी बेअरस्टोला वादावर काही प्रश्न विचारले. यावेळी बेअरस्टोने म्हणाला, आम्ही जवळपास १० वर्षांपासून एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. हा कसोटी सामना आहे आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत, जे काही झाले ते खेळाचा भाग आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. मैदानात जे काही घडले तो खेळाचा एक भाग होता.

मी त्याला रात्री जेवायला बोलवले नव्हते म्हणून तो चिडला असं मजेत उत्तर बेअरस्टोने दिले. पण आज रात्री आम्ही एकत्र डिनर करत असल्याचे दिसेल. याबाबत काळजी करण्याची काहीही गरज नाही. या प्रकरणावर इतर खेळाडूनी प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.

न्यूझीलंडच्या जिमी नीशमने (Jimmy Neesham) या प्रकरणाबद्दल ट्विट केले आहे. 'आमचे विरोधी संघ जॉनी बेअरस्टोला का चिडवतात हे समजत नाही, त्यानंतर ते १० पटीने चांगले होतात., असं ट्विट जिमी नीशमन याने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com