मुंबई: राज्यात कालपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणीसह विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, कोकणासह राज्यातील विविध ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसापासून तुरळक पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान, काल रात्रीपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली. नवी मुंबईत मागिल १२ तासांत सर्वाधिक पाऊस झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवानमान विभागाने वर्तवली आहे.
कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे, चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी पावसामुळे चिपळूण शहरात हाहाकार माजवला होता. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल रत्नागिरी, रायगड, चिपळूण या परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. या परिसरातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
रायगडमध्येही मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. रायगडमध्ये प्रशासन सज्ज झाले आहे. महाडमध्ये ९, पोलादपूरमध्ये १३, माडगाव मध्ये १ अशा २३ गावांमधील सुमारे १५५३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तर २५ जवानांसह एनडीआरएफसहच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवरुन दिली आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. तीन ठिकाणी दरड कोसळलेली आहे. त्यामुळे वाहुक बंद करण्यात आले आहे. या घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू होते. रत्नागिरी जिल्ह्याला अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. राजापुरातील (Rajapur) अर्जुना आणि कोलवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहराला पुराचा विळखा बसला आहे.
पोलदपूर तालुक्यातील चोळई गावाला दरडीचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण चोळई गावाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूवात झाली आहे. सलग २४ तास पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. १२ तासांत पंचगंगा नदीची पाणी पातळी ८ फुटांनी वाढली आहे. नदीकाठच्या नागरिकांना पात्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.