villagers seriously injured in honeybee attack near vaibhavwadi sindhudurg  Saam Digital
महाराष्ट्र

पीपीई किट घालून ग्रामस्थांना मृतदेहावर करावे लागले अंत्यसंस्कार, वैभववाडीत नेमकं काय घडलं?

villagers seriously injured in honeybee attack near vaibhavwadi sindhudurg : मृतदेहावर देखील मधमाशा बराच वेळ घोंघावत होत्या. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथे घडली. अखेर दोन तासानंतर पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली.

तिथवली महंमदवाडी येथील शेतकरी पांडुरंग कृष्णा हरयाण (वय 70) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी सकाळी नागरिकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरातून बाहेर काढला. यावेळी सुमारे 70 ग्रामस्थ उपस्थित होते. विधी सुरू असल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीच्या बाजूला ठेवण्यात आला होता.

स्मशानभूमीत काही ग्रामस्थ सुकलेली लाकडे जाळून धूर करत होते. स्मशानभूमीच्या बाजूला अडगळीत झाडावर काळंबा मधमाशांचे पोळे होते. धुराचा लोळ त्या मधमाशांच्या पोळाकडे जाताच मधमाशा आक्रमक झाल्या. उठलेल्या माशांनी स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ग्रामस्थ मिळेल त्या वाटेने सैरावैरा पळत सुटले. अनेक जण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले.

मधमाशांनी ग्रामस्थांचा जवळपास एक किलाेमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. या हल्ल्यानंतर तब्बल अडीच तासानंतर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाच पीपीई किट घटनास्थळी नेण्यात आले. त्यानंतर मयत पांडुरंग हरयाण यांच्या मुलाने किट घालून विधी पूर्ण केले. त्यांच्याबराेबर असलेल्या चार ते पाच जणांना पिपीई कीट घालून स्मशानभूमीत जात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी, उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाव्य दहशतवादी हल्ल्या विरोधात एन एस जी ची आयटी पार्क हिजवडी परिसरात मॉक ड्रिल

Diabetes: डायबिटीचे रुग्ण आहात? सकाळी चुकूनही 'या' गोष्टी करु नका

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार; विरोधकांचं टेन्शन वाढणार,VIDEO

Shukra Gochar 2025: पाच राशींचं नशीब पालटणार; छप्परफाड होणार कमाई, मिळणार प्रेम, घर, पैसा अन् गाडी

SCROLL FOR NEXT