Sindhudurg: वैभववाडीत गटाराचे पाणी रस्त्यावर आले; ठाकरे गटाने चिखलात बसून नगरपंचायतीचा नाेंदविला निषेध

Uddhav Thackeray Faction Andolan : उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने गटारातुन पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
Sindhudurg: वैभववाडीत गटाराचे पाणी रस्त्यावर आले; ठाकरे गटाने चिखलात बसून नाेंदविला निषेध
uddhav thackeray faction andolan in vaibhavwadiSaam Digital

- विनायक वंजारे

वैभववाडी नगरपंचायतीने 75 लाख रूपये खर्च करून बांधलेल्या गटारातुन पाणी वाहण्याऐवजी ते पाणी शहरातील रस्त्यावरून वाहत असल्यामुळे येथील नगरसेवक, व्यापारी आक्रमक झाले. त्यांनी नगरपंचायतीच्या निषेधार्थ चिखलाच्या पाण्यात बसुन नुकतेच आंदोलन केले.

बुधवारी सायंकाळी वैभववाडीत अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावर आले होते. वैभववाडी नगरपंचायतीने दत्तमंदिर ते हॉटेल सावलीपर्यत गटाराचे बांधकाम केले. याशिवाय सांगुळवाडी रस्त्यालगत देखील गटाराचे बांधकाम केले आहे.

Sindhudurg: वैभववाडीत गटाराचे पाणी रस्त्यावर आले; ठाकरे गटाने चिखलात बसून नाेंदविला निषेध
Cibil Score ठरताेय पीक कर्जासाठी अडथळा, सक्ती हटवा; शेतक-यांची मागणी

या दोन्ही गटार कामांसाठी सुमारे पाऊणकोटी रूपये खर्च केले. परंतु प्रत्यक्षात या गटारातुन पाणी जात नसल्यामुळे शहरातील जुने बसस्थानक, रिक्षा स्टॅन्डसमोर रस्त्यावर पाणी साचले. तसेच आठवडाबाजाराकरीता आलेल्या काही दुकानामध्ये पाणी शिरले.

हि माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी व्यापारी, नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नगरपंचायतीचा निषेध नोंदवित चक्क चिखलाच्या पाण्यात बसुन आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी तातडीने गटारातुन पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Sindhudurg: वैभववाडीत गटाराचे पाणी रस्त्यावर आले; ठाकरे गटाने चिखलात बसून नाेंदविला निषेध
Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com