Maharashtra Politics Latest News:  Saam TV
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: 'विशाळगडावरील घटना सरकार प्रायोजित, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा'; विजय वडेट्टीवार यांचे CM शिंदेंना पत्र!

Vishalgad Encroachment Latest Update: विशाळगडावर घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच‌ आहे. ही घटना सरकार प्रायोजित होती, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Gangappa Pujari

सुनिल काळे| मुंबई, ता. १८ जुलै २०२४

विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. गडावर झालेला वाद हा सरकारच्या अपयशामुळे झाल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित जिल्हाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"विशाळगडावर घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच‌ आहे. ही घटना सरकार प्रायोजित होती. रवी पडवळ हा माणूस पुण्यातून चालत गेला. त्याच्यावर कारवाई केली असती तर ही घटना टळली असती," असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

"अतिक्रमण एका समाजाचं नव्हतं. कोर्टात वकिलाला जाण्यापासून कोणी रोखले. कोल्हापुरात महाराज जिंकून आल्याने सरकारच्या पायाखालची वाळू खचली आहे. शिवप्रेमी अशी घटना करु शकत नाहीत, त्याला जातीय रंग द्यायचा प्रयत्न होतोय, उपमुख्यमंत्री म्हणतात हिरवे झेंडे नाचवणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी," असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

"याबाबत पोलीस बघ्याची भूमिका घेत होते, दंडुके हलवलेसुद्धा नाहीत. याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, जिल्हाधिकारी यांची तात्काळ बदली करा, तसेच रवी पडवळ याच्या मुसक्या आवळा अशा मागण्या विजय वडेट्टीवार यांनी केल्या असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Mumbai Fire : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

Success Story: मराठी माध्यमातून शिक्षण, आधी MBBS मग UPSC; सोलापूरचे भगवंत पवार झाले वैद्यकीय अधिकारी

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

SCROLL FOR NEXT