Vijay Wadettiwar  Saam Digital
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मराठा समाजाला न टिकणारं आरक्षण दिलंय, विजय वड्डेटीवार यांनी केलं हे आवाहन

Maratha Reservation : मतदारांवर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय यापूर्वीही या सरकारने घेतले आहेत. त्यामुळे असे उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्या आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत मतदान करावं, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

Sandeep Gawade

Vijay Wadettiwar

मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केलं हे लपून राहिले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारं आरक्षण दिलंय अशी मराठा समाजाची समज झाली आहे किंवा त्यांना कळून चुकलं आहे. तोच रोश मराठा समाजाचा सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे. मतदारावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय यापूर्वीही या सरकारने घेतले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला विनंती आहे की, असे उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्या आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत मतदान करावं. उमेदवार उभे करणे, मनातील राग काढण्यासाठी लोकशाहीसाठी योग्य राहणार नाही, असं आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला केलं आहे.

भाजप एकनाथ शिंदे, अजित पवारांना किती जागा देईल?

महाराष्ट्राची यादी यासाठी तयार होत नाही कारण एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाला किती जागा द्याव्यात हे भाजपकडून हे अद्याप निश्चित झालं नाही. जास्तीत जास्त चार त्यांना चार-चार जागा मिळतील. त्यानंतर महायुतीची महाराष्ट्रातील फायनल यादी जाहीर होईल, असं ते म्हणाले. जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील, त्यानंतर पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटेलेला दिसेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या भाषण सुरू असताना महिला उठून जात होत्या. त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आता विश्वासार्हता राहिली नाही. विदर्भीय जनता काँग्रेसच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहणारी आहे. यापुढेही जनता कॉंग्रेसच्या मागे उभे राहिलं असं, ते म्हणाले.

मेळाव्याला लोक भाडोत्री आणले?

भाजप लोकांना वेटीस धरून खासगी गाड्या भाड्याने लावून मेळाव्यासाठी लोक जमवंत असतं. असा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणार असतो की वेठीस धरणारा असतो हे मतदानातून समोर येईलंच. हा पक्ष्याचा कार्यक्रम आहे. एवढा निवडणूक निधी त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते एक लाखच नाही तर दोन लाख सुद्धा लोकांना मेळाव्यासाठी आणू शकतील. जेवढ्या गाड्या लावतील तेवढे लोक जास्त येतील, पण गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक उभे राहात नाहीत तर आपण लोकांना काय दिलं हे महत्त्वाचं आहे. लोकांना ते चांगलं समजत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

राज्याची कायदा व सुव्यवस्था कोडमडली?

कारवाई करणं पोलिसाचं काम आहे. सरकार कुणावर कारवाई करतं, बेताल वक्तव्य करणाऱ्या वर कारवाई करतं का? गुंडाला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करते का? महिलांबद्दल वक्तव्य करतात, माईकवरून ठार करण्याचं वक्तव्य करतात, हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेल्या पैशामुळे घडत आहे. त्यामुळे कारवाईची अपेक्षा करणं आणि कितीही अन्याय झाला तरी न्याय मिळेल हा गैरसमज आहे. एकाने कारवाई करायला सुरुवात केली दुसरा फोन करतो दुसऱ्याने फोन केला की तिसऱ्याचा फोन येतो, त्यामुळे याचं ऐकू की त्याचं ऐकू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा

घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

SCROLL FOR NEXT