Vijay Shivtare vs Ajit Pawar in Baramati Saam TV
महाराष्ट्र

Pune News : शिवतारेंचा गेम झाला, काल दादांचं तोंडभरून कौतुक केलं अन् आज डच्चू मिळाला

Pune News : पुणे जिल्हा नियोजन समितीतून विजय शिवतारे यांना वगळले आहे. त्यामुळे ही बैठक सुरू होण्यापूर्वीच महायुतीत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आज पहिल्यांदा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. सकाळी बीड जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक उरकून सायंकाळी चार वाजता अजित पवार पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच महायुतीत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळल्याच चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळलं आहे.

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. मात्र जिल्ह्यात एकमेव आमदार असलेल्या विजय शिवतारे यांना वगळल्यामुळे महायुतीत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सरकारने काढलेल्या 'जीआर'चा पूर्ण अभ्यास करून मी यावर प्रतिक्रिया देईल असं विजय शिवतारे म्हणाले आहेत. शिवतारे यांची अशी प्रतिक्रिया आली असली तरी निवडणुकीपूर्वी जागा वाटपात शिवसेनेला डावल्याचं चित्र होतं आणि आता निवडणुकीनंतर जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हा नियोजन समितीतून सुद्धा शिवसेनेला डच्चू मिळाल्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेंचा शिवसेनेच नक्की स्थान काय असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय.

सुरुवातीला मुख्यमंत्रीपद त्यानंतर पालकमंत्री पद आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमधून सुद्धा शिवसेनेला वगळण्यात येत असल्याचं समोर आल आहे. त्यामुळे वेळोवेळी नाराज होऊन दरे गावी जाणारे एकनाथ शिंदे यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांनी समोर येत होती. आता तर थेट जिल्ह्याच्या नियोजन समितीत भाजप आणि राष्ट्रवादीला मानाचा पान मिळतं आणि शिवसेनेला मात्र पद्धतशीरपणे बाजूला केले जात आहे. अशी भावना निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पद या दोन गोष्टींवर नाराज झालेले एकनाथ शिंदे पुन्हा नाराज होऊन दरे गावी जाणार की यावर ठोस भूमिका घेणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्याचंच पाहायला गेलं तर विजय शिवतारे आणि अजित पवार हे पारंपरिक विरोधकच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडलं होतं. त्यानंतर 2024 मध्ये राजकीय समीकरण बदलले आणि राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेची युती झाली. यामध्ये सुद्धा अजित पवार आणि विजय शिवतारे यांचे मन जुळवण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागली होती. आता शिवतरे आणि पवार यांच सगळं सुरळीत झालं असं चित्र निर्माण होत असतानाच. अजित पवार पालकमंत्री असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या नियोजन समितीतूनच शिवतारे यांना वगळल्यामुळे पुणे जिल्ह्यात पवार विरुद्ध शिवतारे या संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो.

कालच विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच तोंडभरून कौतुक केलं होतं. अजित पवार कामाच्या बाबतीत तगडा माणूस आहे. चांगलं काम घेऊन गेले तर अजित पवार काम करतात असं म्हणत शिवतारे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या नियोजन समितीतूनच विजय शिवतारे यांना वगळल्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध शिवतारे असा संघर्ष पुणे जिल्ह्यात पाहायला मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Secret Santa Gifts For Women: आला सिक्रेट सॅन्टाचा खेळ! ऑफिसमधील महिला सहकाऱ्यांसाठी घ्या 'या' 5 उपयोगी वस्तू

Shevgyachya Shenga Recipe : थंडीत बनवा झणझणीत सुक्का शेवगा शेंगाची भाजी, वाचा रेसिपी

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात

Dhurandhar: 'मला वाटलं माझं पात्र...'; धुरंधरमुळे अक्षय खन्नाला प्रसिद्धी मिळाल्याने आर. माधवन नाराज?

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज

SCROLL FOR NEXT