Sanjay Gaikwad Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: पोलिस की आमदारांचे घरगडी? पोलिस धुतायेत आमदाराची गाडी; संजय गायकवाड पुन्हा वादात

Maharashtra Politics: आता बातमी आहे बुलढाण्यातून...मारहाण, गुंडगिरी आणि वादग्रस्त वक्तव्य यासाठी कुप्रसिद्ध असूनही ज्यांना मुख्यमंत्री शिंदे कायम अभय देतात असे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडलेत.

Girish Nikam

आमदार संजय गायकवाड मतदारसंघ बुलढाणा, पक्ष शिवसेना शिंदे गट... नको त्या कारनाम्यांमुळे नेहमी वादात राहणारे आमदार अशीच गायवडांची ओळख बनत चाललीय. बदलापूर शाळेच्या संवेदनशील प्रकरणात राज्यातून संताप व्यक्त होत असताना 'आता मुख्यमंत्री शाळेत पहारा देणार का?” असं वादग्रस्त वक्तव्य करणारे गायकवाड पुन्हा नव्या वादात सापडले आहेत.

त्याचं झालं असं की, या आमदार महोदयांची गाडी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्यांला धुवायला लावली. याचा व्हिडिओही समोर आला आहे. पोलिस कर्मचारी गायकवाडांच्या संरक्षणासाठी आहे आणि तो त्यांची गाडी धुतोय.

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे पोलिस हे सुरक्षेसाठी आहेत की, आमदारांचे घरगडी, असा संतप्त सवाल केला जातोय. मात्र यावर पोलिस कर्मचाऱ्याने गाडीत उलटी केल्यामुळे गाडी धुतल्याची थातूर मातूर सारवासारव करण्याचा प्रयत्न आमदार गायकवाडांनी केलाय.

गायकवाडांना वाद तसा नवा नाही. कारण यापूर्वीही त्यांनी नको ते कारनामे केले आहेत. मुलाच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापून मुलाला आणि पत्नीला तलवारीनंच केक भरवल्यामुळे ते वादात सापडले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या गुन्हेगारी कृत्याचं निर्लज्जपणे समर्थनही केलं होतं.

त्यासाठी त्यांनी ऑलिम्पिकचं उदाहरण देऊन अकलेचे तारेही तोडले होते. यांमुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. काही महिन्यांपूर्वीच आपल्या गळ्यातील चैनीत वाघाचा दात असल्याचा दावा करत वाघाची स्वतः शिकार केल्याचं वक्तव्य केलं होतं. वन विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. आता पोलिसांना गाडी धुवायला लावून घरगड्यासारखी वागणूक देणारे गायकवाड पुन्हा वादात सापडले आहेत. यातच नेत्यांच्या सरंजामी वृत्तीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT