CM Eknath Shinde Regret: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर CM एकनाथ शिंदेंनी मागितली माफी

Cm Eknath Shinde On Shivaji Maharaj Statue Collapse: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर CM एकनाथ शिंदेंनी मागितली माफी
CM Eknath Shinde Apologize Saam Tv
Published On

CM Eknath Shinde Apologies: मालवण यथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधता ते असं म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''काल रात्री एक महत्त्वाची बैठक झाली. सिंधुदुर्गमध्ये पुतळा दुर्घटना बाबत चर्चा झाली. ही खरतर खूप वेदनादायी घटना आहे. नौदलाने महाराजांचा पुतळा बनवला होता. कालच्या बैठकीत सरकारमधील मंत्री, तसेच नौदलाने अधिकारी आणि पोलीस सुद्धा उपस्थित होते.''

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर CM एकनाथ शिंदेंनी मागितली माफी
Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये शिवपुतळा उभारताना गफलत झाली, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''कालच्या बैठकीनंतर एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समिती मध्ये नौदलाने अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञ यांचा समावेश करण्यात आला आहे.''

'नवीन पुतळा उभारण्यात येणार'

मुख्यमंत्री म्हणाले की, ''तिथले वारे, वातावरण आणि एकूणच परिस्थीचा आढावा घेऊन महाराजांचा नवीन मजबूत पुतळा उभा करण्यात येणार आहे.''

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर CM एकनाथ शिंदेंनी मागितली माफी
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'ला पुन्हा हायकोर्टात आव्हान, याचिकाकर्त्याने याचिकेत नेमका कशावर आक्षेप घेतला? वाचा

'विरोधकांनी राजकारण करू नये'

या घटनेनंतर विरोधी पक्ष सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यालाच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''विरोधकांनी यावर राजकारण करणे योग्य नाही. कारण महाराष्ट्रचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांच्या पायावर मी हजार वेळा नतमस्तक आहे. अजित पवारांनी तर यावर माफी सुद्धा मागितली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाहीये. विरोधकांनी सुद्धा यावर राजकारण करू नये.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com