weather  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : सूर्यदेव कोपला! कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तापमान? आकडेवारी बघून दरदरून घाम फुटेल

Maharashtra Weather : राज्यातील विविध भागात तापमान वाढू लागलंय. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झालं आहे. सर्वाधिक तापमान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. राज्यातील विविध भागात सूर्य आग ओकू लागल्याचे पाहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे देखील जिकरीचे झाले आहे. या उन्हामुळे रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आहे. विदर्भातील जिल्ह्यात तापमान चाळीशी पार गेलं आहे. राज्यात सर्वाधिक तापमान नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळालं.

राज्यात सर्वाधिक तापलेल्या जिल्ह्यात नागपूरचा समावेश झाला आहे. नागपूरमध्ये 44.7 अंश तापमानाची नोंद झाली. तेच विदर्भ तापत असताना सर्वाधिक तापमान नागपूर जिल्ह्यात नोंदवण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने तापत असलेल्या अकोला जिल्ह्याला मागे टाकले आहे. अकोल्यात 44.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यातील तापमान 40 अंशाच्या वर नोंदवले गेले आहे.

विदर्भातील जिल्ह्यांचे तापमान

नागपूर - 44.7

अकोला - 44.3

चंद्रपूर - 44 .00

वर्धा - 44.00

अमरावती - 43.8

ब्रह्मपुरी - 43.6

यवतमाळ 43.5

गडचिरोली 42.2

मालेगावचा पारा पुन्हा 43 अंशावर पोहोचला

नाशिकच्या मालेगावसह ग्रामीण भागात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. मालेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा कमी जास्त होत होता. मात्र आज तापमानाचा पारा कालच्या तुलनेत वाढला आहे. मालेगावात तापमान 43 अंशावर पोहचल्याची नोंद करण्यात आली. सकाळ पासूनच तापमान वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. दुपारनंतर रस्त्यावरची वर्दळकमी झाली आहे. तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अकोल्यात सूर्य कोपला

अकोल्यात आज 44.3 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. सलग ३ दिवसांपासून अकोल्यात तापमानाचा पारा ४४ अंशापार कायम आहे. दरम्यान, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 21 आणि 22 एप्रिलला दोन्ही जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर जाण्याची वर्तविली शक्यता आहे. दरम्यान, काल 44.2 अंश सेल्सिअस इतकी तापमान होतं तर परवा अर्थातच गुरुवारी 44.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यात होते.

धुळ्यात तापमानचा पारा वाढला

धुळ्यामध्ये सलग आठव्या दिवशी देखील तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. धुळ्यात आज 43.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तापमानाच्या तुलनेत आजचे तापमान वाढल्याचे दिसून आले आहे. सलग आठ दिवसांपासून हा तापमानाचा आलेख वाढताना दिसत आहे. त्यामुळे धुळ्यात तापमानाचे चटके आता धुळेकर नागरिकांना सहन करावा लागत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT