RR vs LSG : मार्करम आणि बदोनीच्या संयमी खेळीने संघाचा डाव सावरला; लखनौचं राजस्थनला इतक्या धावांचं आव्हान

IPL 2025, RR vs LSG : मार्करम आणि बदोनीच्या संयमी खेळीने संघाचा डाव सावरला आहे. लखनौचं राजस्थनला १८१ धावांचं आव्हान दिलं आहे.
IPL 2025
RR vs LSG saam tv
Published On

राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सदरम्यान आयपीएल स्पर्धेतील ३६ वा सामना सुरु आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषब पंतने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या विरोधात खेळताना लखनौच्या मार्करम आणि बदोनीने संयमी खेळी खेळली. लखनौने राजस्थान रॉयल्सला १८१ धावांचं आव्हान दिलं आहे.

IPL 2025
IPL दरम्यान टीम इंडिया अडचणीत; प्रशिक्षकासह तिघांची हकालपट्टी, कारण ऐकून आश्चर्य वाटेल

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या लखनौची चांगली सुरुवात झाली नाही. मिचेल मार्श अवघ्या ४ धावांवर बाद झाला. तर निकोलस पूरन अवघ्या ११ धावांवर बाद झाला. कर्णधार ऋषभ पंत दएखील ९ धावा करून बाद झाला. लखनौची आघाडीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतले. लखनौने ९ षटकानंतर ३ गडी गमावून ६३ धावा केल्या होत्या.

IPL 2025
IPL 2025 : घरच्या मैदानावर RCB तिसऱ्यांदा ढेर, पंजाब किंग्सचा 5 गडी राखून विजय

एडन मार्करमने ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मार्करमने संयमी खेळी खेळत संघाचा डाव सावरला. लखनौचे ११ षटकानंतर धावांचा नवद्दी पार नेला. मार्करम आणि बदोनीच्या भागिदारीमुळे लखनौला फायदा झाला. त्यांच्या भागिदारीमुळे संघाची धावसंख्या शंभरीपार गेली. पुढे लखनौला १३० धावांवर मोठा झटका बसला.

आयुष बदोनी ३४ चेंडूवर ५० धावा करून बाद झाला. बदोनीचा १४३ धावांवर विकेट गेला. लखनौचे १९ षटकपर्यंत १५३ धावा झाल्या होत्या. लखनौ सुपर जायंट्सने २० षटकानंतर ५ गडी गमावून १८० धावा केल्या. एडन मार्करमने टीमसाठी सर्वाधिक ६५ धावा केल्या होत्या. आयुष बदोनीने ५० धावा केल्या. अब्दुल समदने १० चेंडूत ३० धावा कुटल्या. त्याने शेवटच्या षटकात ४ षटकार लगावले. दुसरीकडे राजस्थानच्या वानिंदू हसरंगाने सर्वाधिक २ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com