Madhubhai Kulkarni  Saam tv
महाराष्ट्र

Madhubhai Kulkarni : PM मोदींना राजकारणात आणणारे मधुभाई कुलकर्णी यांचं निधन; छत्रपती संभाजीनगरात घेतला अखेरचा श्वास

Madhubhai Kulkarni News : राजकारणात आणणारे मधुभाई कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरात अखेरचा श्वास घेतला.

Vishal Gangurde

मधुभाई कुलकर्णी यांचं 88 व्या वर्षी निधन

मधुभाईंनी RSS मध्ये विविध पदांवर 60 वर्षांहून अधिक काळ कार्य केलं

PM मोदींना राजकीय क्षेत्रात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचं गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता वृद्धपकाळामुळे छत्रपती संभाजीनगर येथे निधन झालं. मधुभाई कुलकर्णी हे मृत्यूसमयी 88 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय क्षेत्रात आणण्यात मधुभाई कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा होता.

मधुभाई कुलकर्णी यांचा जन्म 17 मे 1938 रोजी कोल्हापुरात झाला होता. मधुभाईंचं शालेय शिक्षण चिकोडी येथे झालं होतं. चिकोडी येथे वास्तव्यास असताना संघाच्या शाखेत जाण्याची ओढ लागली. ते संघाच्या स्थापनेपासून आजतागायत सुरू असलेल्या शतकी वाटचालीचे साक्षीदार होते. कोल्हापुरातून 1954 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर मधूभाई महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला गेले. त्यांनी बीए आणि बीएड्चे शिक्षण घेतलं. त्यांनी काही काळ सेल्स टॅक्स विभागात नोकरी केली. पुढे त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्राच्या जळगावात प्रचारक म्हणून 1962 साली कार्य सुरु केलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरात जिल्हा प्रचारक, सोलापूरचे विभाग प्रचारक, पुण्याचे महानगर प्रचारक म्हणून त्यांच्याकडे दायित्व होतं. 1984 ते 1996 या कालखंडात ते गुजरातचे प्रांत प्रचारक होतं. 1996 ते 2003 या काळात त्यांनी पश्चिम क्षेत्राचं प्रचारक म्हणून काम केलं.

2003 ते 2009 या काळात ते संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. या काळात त्यांचे वास्तव्य तत्कालीन आंध्रप्रदेशच्या हैदराबाद येथे होते. वयोमानामुळे 2015 पासून ते दायित्वमुक्त होऊन छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्याला होते. अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी 2 आठवड्यापूर्वीच त्यांची प्रत्यक्ष भेट घेत प्रकृतीची चौकशी केली होती. परंतु, आज, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मधूभाईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी समर्पण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ठेवण्यात आले आहे. त्यांनी देहदान केले आहे. त्यांचे पार्थिव रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, आर के दमाणी मेडिकल कॉलेज येथे सोपविले जाणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

SCROLL FOR NEXT