Gorakhpur Student Case : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर; दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Gorakhpur Student Case update : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडल्या.
Gorakhpur Student
Gorakhpur Student Case update Saam tv
Published On
Summary

विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्करावर पोलिसांनी चकमक केली

आरोपी रहीम दोन्ही पायांवर गोळ्या लागून जखमी झाला

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या घटनेवरून पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय

पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीये

गोरखपूरमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्काराचा पोलीस एन्काऊंटर केला आहे. पोलिस आणि आरोपीच्या चकमकीत गोतस्कार जखमी झाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गोतस्कार जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली.

Gorakhpur Student
Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

गोरखपूरचे एसएसपी राज करण नय्यर यांनी सांगितलं की, आरोपी रहीम हा गोरखपूरच्या पिपराइच पोलीस आणि कुशीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जखमी झाली. त्यानंतर आरोपीला अटक केलं. तर इतर जखमी आरोपी अजब हुसैनला स्थानिकांनी पकडून रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आरोपी छोटू आणि राजूला देखील अटक केली आहे. पोलिसांकडून इतर दोन आरोपींचा शोध सुरु आहे.

Gorakhpur Student
Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलं की, एन्काऊंटरनंतर एखादा मृत्यूमुखी पडल्यास त्याचा जीव परत येईल का? त्याच्या आई-वडिलांना मुलगा पुन्हा मिळेल का? असा सवाल यादव यांनी उपस्थित केला.

Q

गोरखपूरच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी कोण आरोपी आहे?

A

रहीम नावाचा गोतस्कर आरोपी आहे. त्याच्यावर विद्यार्थ्याच्या हत्येचा आरोप आहे.

Q

पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली?

A

गोरखपूर आणि कुशीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाई केली. पोलिसांच्या चकमकीदरम्यान आरोपी जखमी झाला. त्यानंतर अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com