Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर
ग्वाल्हेरमधील पत्नीने पतीवर उकळतं पाणी ओतून हल्ला केला
पती आकाश जाटव झोपेत असताना त्याच्यावर अंगावर उकळतं पाणी ओतलं
पतीची पत्नीविरोधात पोलिसांत गुन्हा
आकाशवर रुग्णालयात उपचार सुरु
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीने तिच्या पतीवर उकळतं पाणी ओतल्याची घटना घडली आहे. अंग भाजल्याने नवऱ्याची झोप उडाली. पत्नीने केलेल्या कृत्याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच तिने हातोड्याने हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या पतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. संपूर्ण प्रकरण हे ग्वाल्हेर जिल्ह्याच्या भितरवार गावातील वार्ड क्रमांक ३ मधील आहे. शेतकाम करणारा आकाश जाटव हा मंगळवारी घरात गाढ झोपेत होता. त्याचवेळी त्याची पत्नी पूजा ही नवऱ्याजवळ आली. त्याने आकाशच्या कानात उकळतं पाणी ओतलं. अंग भाजल्यानंतर जाग आलेल्या आकाशने पूजाचा प्रतिकार केला. मात्र, पूजाने त्याचवेळी सगळं उकळतं पाणी आकाशच्या अंगावर ओतलं.
अंगावर उकळतं पाणी ओतल्यानंतर हातोड्यानेही हल्ला केला. या घटनेत आकाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेलं. तिथे प्राथमिक उपचारानंतर ग्वाल्हेरला जाण्यास पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं.
पतीच्या तक्रारीनुसार, पत्नीने शिवीगाळ आणि मारहाण केली. तिने सर्व मर्यादा ओलांडली आहे. बायकोने घरातील सर्व सामान घराबाहेर फेकलं. त्यानंतर खोलीत दरवाजाला आतून कडी लावून बसली.
बायको मानसिक आजाराने ग्रस्त
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शेजाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर हल्लेखोर महिला मानसिक आजारी आहे. दोघांना दोन मुले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पत्नीला खरंच मानसिक आजाराने ग्रस्त आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.