Vegetable Price  Saam Tv
महाराष्ट्र

Vegetable Price: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! पालेभाज्यांसह लसणाचे दर घसरले; तुमच्या शहरातील भाव करा चेक

Vegetable Price Decreases: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पालेभाज्या आणि लसूणचे दर घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

डॉ. माधव सावरगावे

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पालेभाज्यांचे दर घसरताना दिसत आहे.पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत परंतु शेवगा आणि अनेक फळभाज्यांचे दर स्थिर आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी येथील बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून आला. आठवडाभरापूर्वी १० रुपयाला मेथी, पालक, शेपू, कोथिंबिरीची एक जुडी मिळत होती. परंतु आता १० रुपयांत तीन जुड्या मिळू लागल्या. मात्र, शेवग्याच्या दरात कोणताही बदल झालेला दिसला नाही. किरकोळ बाजारात शेवगा ३५० ते ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे. मागील आठवड्यातील तुलनेत आवक थोडी वाढली असून चार क्विंटल शेवगा बाजारात दाखल झाला. इतर भाज्यांच्या दरातही काहीशी घट दिसून आली. लसणाचा दर ४० ते ५० रुपये कमी झाला. चांगल्या प्रतीच्या लसणाला ३०० ते ५०० रुपये किलो दर मिळत आहे. अदरक ३० ते ३५ रुपये किलो दराने विक्रीस असून, मागील आठवड्यात हा दर ४० रुपये किलो होता. शिमला मिरचीचा दर २५ ते ३० रुपये किलो झाला आहे, तर पत्ताकोबी व फुलकोबी ३० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. ३० ते ३५ रुपयांना एक किलो लिंबू मिळतं आहेत. (Vegetable Price Decreases)

भाज्यांचे भाव भाव (किलोमध्ये) (Vegetable Price Per Kg)

वालाच्या शेंगा-२० रुपये

डिंगऱ्या-२० ते २५ रुपये

डांगर भोपळा-३० ते ३५ रुपये

कारले=३५ ते ४० रुपये

चायना काकडी=२० रुपये

गावरान काकडी=३० रुपये

हिरवी मिरची=२५ ते ३० किलो

खिरे=२० ते ३० रुपये

टोमॅटो=२० ते ३० रुपये

बंदी असताना देखील एपीएमसी मध्ये चायना लसूणची विक्री, एपीएमसी प्रशासनाची डोळेझाक

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भारतीय लसणाला चांगला भाव मिळत आहे. मात्र बंदी असताना देखील एपीएमसी मधील काही व्यापाऱ्यांकडून चायना वरून लसूण आयात केला जात असून एपीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. भारतीय लसूण चवीला चांगला असल्याने 250 ते 400 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय मात्र असून चायना लसूण आकाराने मोठा आणि दर कमी असल्याने ग्राहकांची सहज फसवणूक होत असून भारतीय लसणाच्या नावाखाली चायना लसणाची विक्री व्यापाऱ्यांकडून करण्यात येतेय ज्याकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT