Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Red Peppers : लाल मिरची महागणार; उत्पादनात प्रचंड घट, गतवर्षीच्या तुलनेत अवघी २५ टक्केच खरेदी

Nandurbar News : यावर्षी झालेला जास्त पाऊस आणि मिरचीवर आलेल्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट आली आहे.
Published on

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड लाख क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली होती. मात्र यावर्षी हा आकडा अवघा पस्तीस हजार क्विंटल आहे. जास्त पाऊस आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असल्याने मिरचीची आवक कमी झाली आहे. 

नंदुरबार (Nandurbar News) जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी झालेला जास्त पाऊस आणि मिरचीवर आलेल्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bajar Samiti) दीड लाख क्विंटलपर्यंत लाल मिरचीचे आवक झाली होती. मात्र यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत अवघ्या ३५ हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे. यावर्षी लाल मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याचा अंदाज बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.  

Nandurbar News
Nagpur News : कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मिरची महागणार 

लाल मिरचीच्या उत्पादनात घट येणार असल्याने येणाऱ्या काळात लाल मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात अत्यावश्यक असलेल्या चटणीच्या किमतीही वाढतील; असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीला प्रतवारीनुसार दोन हजारपासून पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर सुकलेल्या लाल मिरचीला सहा हजारपासून ते १२ हजार रुपयांपर्यंतचा दर आहे. येणाऱ्या काळात मिरचीचे उत्पादन कमी असल्याने मिरचीचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com