Mumbai Best Bus Accident : कुर्ल्यात मृत्यूतांडव! बेस्ट बसने जो-जो समोर आला, त्याला थेट चिरडलं; नेमकं काय घडलं?

kurla Best Bus Accident : सोमवारी रात्री कुर्लामध्ये नागरिकांमध्ये घबराट होती. बेस्ट बसला पाहून लोक सैरावैरा धावत होते. कामावरून घरी परतणाऱ्या ५ जणांना मृत्यूने गाठलं. बेस्ट बसच्या अपघाताचा घटनाक्रमक पाहूयात...
Mumbai Kurla Best Bus Accident
Mumbai Kurla Best Bus Accident Mumbai Kurla Best Bus Accident
Published On

Mumbai Kurla Best Bus Accident :कुर्ला इलेक्ट्रिक बेस्ट बस अपघातामध्ये मृताची संख्या ५ वर पोहचली आहे, तर ३१ जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलेय.

कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं ५ जणांचा जीव घेतला. अनेकांना उडले. खासगी वाहने, रिक्षा, पोलिसांची गाडी, सर्वांना जो समोर दिसेल त्याला उडवले. (Kurla Bus Accident)

घटनास्थळाचे दृश्य भीषण असल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. अनेक रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनांचा चक्काचूर झाला. अनेक जण जखमीही झाले. या घटनेनंतर परिसरात घबराट निर्माण झाली होती. अनेकजण सैरावैरा धावत सुटले होते. या अपघातात आतापर्यंत काय काय झालं पाहूयात...

Mumbai Kurla Best Bus Accident
Mumbai Best Bus Accident : बेफाम बसने ५ जणांना चिरडले, ३१ जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर, चालकाला ठोकल्या बेड्या

भरधाव बसचा थरार, अपघात नेमका घडला कसा?

  • रात्री ९.३५ ला A-३३२ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस कुर्ला पश्चिमेकडून आगरकर चौक, अंधेरीच्या दिशेने रवाना झाली.

  • बस स्थानकातून बस निघताच ५० मीटर अंतरानंतर चालकाचा बस वरील ताबा सुटला.

  • स. गो. बर्वे मार्गावरील समोर येणाऱ्या प्रत्येकाला उडवत बस सुसाट निघाली.

  • वाटेत रिक्षा तसेच पोलीस व्हॅन अश्या सगळ्यांना बसने उडवलं.

  • शेवटी समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्यानंतर बस वळली आणि बाबासाहेब आंबेडकर नगरच्या प्रवेशद्वारात घुसली.

  • शेवटी रहिवासी इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर आदळून बस अखेर थांबली.

Mumbai Kurla Best Bus Accident
Mumbai Best Bus Accident: कुटुंबीय लग्न समारंभात होते अन्...; प्रत्यक्षदर्शींने सांगितला भरधाव बेस्ट बस अपघाताचा थरार
  • अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य ३१ जण जखमी झाले

  • भरधाव बस पोलीस व्हॅनला धडकल्याने तीन पोलीस कर्मचारी देखील जखमी.

  • पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल यांनी घटनास्थळावरून बस बाहेर काढली.

  • पंचनामा करून गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू झाली.

  • बेदरकारपणे वाहन चालवणे आणि निष्काळजीपणे मृत्यू प्रकरणी चालक संजय मोरेला अटक कऱण्यात आली.

  • बसचे ब्रेक फेल झाल्याचा आणि आपोआप स्पीड वाढत चालल्याचं चालकाने तपासावेळी सांगितले.

  • पोलीस चालकाच्या वैद्यकीय चाचणी अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

  • मंगळवार सकाळपासून कुर्ला डेपोमधून बेस्ट बसच्या सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

Mumbai Kurla Best Bus Accident
BEST bus Accident: भरधाव बेस्ट बसने शाळकरी मुलाला उडवले, चिमुकल्याचा मृत्यू

चालकाला बेड्या, गुन्हा दाखल -

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात पोलिसांनी आरोपी बस चालक संजय मोरे याला रात्री उशीरा अटक केली. बस चालकाचे वर 54 असून तो अनेकवर्षांपासून बस चालक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी संजय मोरे याच्या वर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघात झालेल्या बस मध्ये जवळपास 60 प्रवासी प्रवास करत होते.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी आहेत. तर यात तीन पोलीस आणि 1 एमएसएफ जवान देखील जखमी झाले आहेत. जखमीवर भाभा रुग्णालयात आणि इतर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत..

Mumbai Kurla Best Bus Accident
Mumbai Best Bus Accident: कुटुंबीय लग्न समारंभात होते अन्...; प्रत्यक्षदर्शींने सांगितला भरधाव बेस्ट बस अपघाताचा थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com