Vande Bharat Express x
महाराष्ट्र

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Vande Bharat Express News : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता स्थानिक खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. महाराष्ट्रातील वंदे भारतमध्ये मिसळ, पुरणपोळी, पोहे यांसारखे अस्सल मराठमोळे पदार्थ प्रवाशांना मिळणार आहेत.

Namdeo Kumbhar

Vande Bharat Express Food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता महाराष्ट्रातील अस्सल जेवण अन् नाश्ता मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामध्ये स्थानिक खाद्यपदार्थ वंदे भारतमध्ये उपलब्ध करण्यावर शिक्कामोर्तब झालेय. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चविष्ट पुरणपोळी, झणझणीत मिसळ, पोहे यासह अनेक मराठमोळ्या पदार्धांचा अस्वाद घेता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले आहे.

भारतामध्ये सध्या वंदे भारतच्या १६४ पेक्षा जास्त सेवा सुरू आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारसह दिल्लीमध्ये सर्वाधिक वंदे भारत धावतात. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता स्थानिक खाद्यपदार्थ देण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टूही या बैठकीला उपस्थित होते.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये प्रादेशीक तडका लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या भागातून अथवा प्रदेशातून वंदे भारत जात असेल, त्या ठिकाणाचे विशिष्ट खाद्यपदार्थ देण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आपलेपणा जाणवेल.प्रादेशिक विविधतेनुसार वंदे भारत एक्सप्रेसमध्ये विविध सेवांना जोडणे हा प्रमुख उद्देश आहे. याची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात वंदे भारत ट्रेन्समध्ये केली जाईल. अतिरिक्त गाड्यांमध्ये याचा नंतर हळूहळू विस्तार केला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांने सांगितले.

या बैठकीवेळी रेल्वे मंत्र्यांनी तिकिट प्रणालीमध्ये काही सुधारणा कऱण्याबाबतही आढावा घेतला. बनावट किंवा डुप्लिकेट ओळखपत्रांद्वारे तिकीट बुकिंग रोखण्यासाठी उपाययोजनावर चर्चा झाली. आयआरसीटीसी प्लॅटफॉर्मवर युजर्सची व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. या निर्णयामुळे नवीन युजर्सची नोंदणी दररोज 5,000 पर्यंत कमी झाली. याधी दररोज एक लाखांपेक्षा जास्त नोंदणी होत होती. याला आळा बसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत ३.०३ कोटी बनावट खाती बंद करण्यात आली आहेत. तर २.७ कोटी खाती तात्पुरती निलंबित केलेली आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Maharashtra Live News Update: भाजप-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार- मुरलीधर मोहोळ

Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

SCROLL FOR NEXT