"Scene from the Vaijapur ashram where woman kirtankar Sangitat Tai Maharaj was brutally murdered with a stone — police investigation underway."  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

महिला कीर्तनकाराची आश्रमातच हत्या, दगडाने ठेचून घेतला जीव, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Woman kirtankar Murdered : वैजापूरमध्ये महिला कीर्तनकार संगीताताई महाराज यांची आश्रमात दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Woman kirtankar murdered inside ashram in vaijapur maharashtra : छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या आश्रमात शुक्रवारी रात्री महिला कीर्तनकारची आश्रमात घुसून दगडाने ठेचू हत्या करण्यात आली आहे. महाराज ह.भ.प. संगीताताई पवार यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळखळ उडाली आहे. महिला कीर्तनकाराची दडगाने ठेचून हत्या होणं, ही गंभीर बाब आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे.

ह.भ.प. संगीताताई महाराज यांची यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समजताच वैजापूर आणि संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली. संगीताताई यांची हत्या का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. संगीताताई महाराज यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैजापूर पोलिसांकडून हत्येचा तपास करण्यात येत आहे. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

श्वानपथक घटनास्थळी पोहचले आहे. ह.भ.प. संगीताताई महाराज यांची हत्या का केली? कुणी केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून आश्रमात चौकशी कऱण्यात येत आहे. श्वनपथकाकडून पुरावे शोधण्याचे काम करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अज्ञाताचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच, १० तोळे सोनं ४३०० रुपयांनी महागलं; २४ -२२ कॅरेटचे आजचे भाव किती?

Maharashtra Live News Update: - एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

IND vs AUS : हेड आज संघाबाहेर, भारताच्या संघात बदल होणार? पाहा प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी

Uddhav Thackeray: ठाकरेंचा मराठवाड्यातील दुसरा दौरा, उद्धव ठाकरेंनी साधलं 'टायमिंग'?

'Bigg Boss 19'च्या घरात प्रणित मोरेचं कमबॅक? मिळाली मोठी हिंट

SCROLL FOR NEXT